पाककृती

पनीर टिक्का

Primary tabs

साहित्य : पनीर टिक्का : पनीर - २५० ग्रॅम लाल , पिवळी, हिरवी सिमला मिरची आले लसुण पेस्ट - १ चमचा मीठ लाल मिरची पावडर - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा आमचुर पावडर - १ चमचा लिंबाचा रस - १ चमचा घट्ट दही - १/२ वाटी तंदुरी कलर चाट मसाला - १ चमचा तेल - १ चमचा चटणी : दही - १/२ वाटी कोथिंबीर हिरवी मिरच्या - २ मीठ साखर- १/२ चमचा लसुण पाकळ्या -२ कृती : पनीर व सिमला मिरची यांचे समान आकारचे जरा जाडसर असे काप करावेत. Image removed. एका भांड्यात दही, आले-लसुण पेस्ट, लाल तिखट , मीठ, गरम मसाला , चाट मसाला , आमचुर पावडर , लिंबाचा रस , तंदुरी कलर, तेल एकत्र करुन फेटुन घ्या. ह्या मिश्रणात पनीर व सिमला मिरचीचे काप व्यवस्थीत घोळवुन घ्या व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवुन द्या. १० मिनिटांनंतर हे सर्व काप बार्बेक्यु स्टीक्सवर एका मागोमाग एक याप्रकारे लावा. Image removed. ओव्हन १० मिनिटे प्रिहीट करुन नंतर त्यात ठेवुन १० मिनिटे ग्रील करा. घरी मिनी तंदुर असेल तर त्यावरही भाजता येईल. चटणी : सर्व साहीत्य मिक्सरमध्ये एकजीव वाटुन घ्या. गरमगरम पनीर टिक्का चटणी व सॅलड सोबत खायला द्या Image removed.
वेताळ

आपल्याला पनीर व चिकन टिक्का खायला आवडते.

चिंतामणी

एका भांड्यात दही, आले-लसुण पेस्ट, लाल तिखट , मीठ, गरम मसाला , चाट मसाला , आमचुर पावडर ,
लिंबाचा रस , तंदुरी कलर, तेल एकत्र करुन फेटुन घ्या.

त्या थोडी कसूरी मेथी घालावी. तेल मोहरीचे घालावे. शक्य असल्यास दह्या ऐवजी चक्का वापरावा. म्हणजे पाणी कमी सुटते आणि फ्रीजमधे ठेवायची जरूरी भासत नाही. कसूरी मेथी आणि मोहरीचे तेलाने खुमारी वाढेल.

ह्या मिश्रणात पनीर व सिमला मिरचीचे काप व्यवस्थीत घोळवुन घ्या व फ्रीजमध्ये १० मिनिटे ठेवुन द्या.
१० मिनिटांनंतर हे सर्व काप बार्बेक्यु स्टीक्सवर एका मागोमाग एक याप्रकारे लावा.

फक्त सिमला मिर्ची न घालता त्याबरोबर टोमॅटो आणि कांद्याचे कापसुध्दा घोळवुन लावावे. मॅलिग्नेशन करायला हे मिश्रण लावुन (वे़ळ असेल आणि जास्त चविष्ट खायचे असेल तर) जास्तवेळ ठेवावे.

टारझन

ह्या टिक्क्यासाठी लागणार्‍या त्या सळया भारतात ( पक्षी पुण्यात) कुठे मिळतात ? ह्या ण्यु इयर पार्टीला आमचा बार्बेक्यु करण्याचा विचार आहे .. बार्बेक्यु च्या सामाणाबद्दलही काही माहीती देता आली तर खुप आभारी राहीन मी.

आगाऊ धन्यवाद .

-( चेफ ) टार्जन

चिंतामणी

ह्या टिक्क्यासाठी लागणार्‍या त्या सळया मंडईचे समोर मिळतात. बाबु गेनु मंडळाचा गणपती जेथे बसतो तेथे. बार्बेक्यू म्हणून तीथे मिळणा-या शेगड्या वापरु शकतोस. कोळसा तुला रहाळकर राम मंदिराचेजवळ (शनीपाराकडुन ज्ञान प्रभोदिनीचे दिशेन जाताना) अथवा नारायण पेठेत काकासाहेब गाडगिळांचा वाड्याचे रस्त्यावर वखारीत मिळेल.

बार्वेक्यू घ्यायचा असेल तर कुंभारवाड्यात मिळेल.

टारझन

लई भारी ! धन्यवाद ...
बार्बेक्यु ची पाककृती मी एका इंग्रजी संस्थळावर पाहिलेली आहे . पण ती पुर्ण पाष्चिमात्य स्टाईल मधे आहे. आपल्या इकडे बार्बेक्यु उपलब्ध साधनांमधे कसा करता येईल ह्यावर गणपा , स्वातीतै , प्राजक्ता , चिंतामणी किंवा अजुन कोणी "नविन धागा काढुन " प्रकाश टाकु शकेल काय ?

जागु

प्राजक्ता तों.पा.सु.
प्राजक्ता चिंतामणी सांगतात त्याप्रमाणे कांदाही छान लागतो.

फुड कलर , ईसेंस ज्या दुकानात मिळतात तिथेच तंदुरी कलर मिळेल.त्यात दोन प्रकार असतात रेड व ऑरेंज रेड. त्यापैकी ऑरेंज रेड घ्यावा.

पनीर उर्फ थर्माकोल हा पदार्थ बिलकुल आवडत नाही. वेळेला आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.

गणपा

चला कुणी तरी भेटला पनीर न आवडणारा. :)
बाकी मागे एकदा मिंटीतैने पण असाच पनीर टिक्क्याचा जहाल फोटु दिला होता.

http://www.misalpav.com/node/6387

पण माझं मत, टिक्का असावा तर तो चिकनचाच. ;)

मस्त कलंदर

>>>चला कुणी तरी भेटला पनीर न आवडणारा.
मी पण आहे रे पनीर न आवडणारी.

तसं तर मी मांसाहारही करत नाही, तरी तुझ्या सगळ्या पाकृंचे कौतुक करते. त्याच धर्तीवर या पनीर टिक्क्याचेही कौतुक... ज्याला/जिला कुणाला खायचे ते बनवून खातीलच. :-)

मेघवेडा

मीही. पण पाकृचे कौतुक. फोटो मस्तच आलाय!

>> वेळेला आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.
हे भारीच! इतकी पराकोटिची नावड नाहीये माझी पण हा अ‍ॅटिट्यूड भारीच! ;)

विंजिनेर

आम्ही सोलकढीत बुडवुन रोटी खाऊ पण पनीर नको.

परा, नुसती रोटी बुडवून खायच्या ऐवजी बटर-रोटी किंवा कुल्चा खा. भारी लागते. आणि हो, सोलकढीत आल्याच्या ऐवजी लसूण वापरणे गरजेचे आहे.

परा, नुसती रोटी बुडवून खायच्या ऐवजी बटर-रोटी किंवा कुल्चा खा. भारी लागते. आणि हो, सोलकढीत आल्याच्या ऐवजी लसूण वापरणे गरजेचे आहे.

च्यायला हे नविनच. करुन बघायला पाहिजे प्रकार. एकदा सोलकढी आणुन तिला लसणाची फोडणी देउन बघतो ;)

पियुशा

म्मस्त यम्मि पनीर आवड्त जाम आप्ल्याला

भानस

एकदम टेम्प्टींग दिसतेय. :)

मदनबाण

आयला !!! पनीररररररररररररररररररररररररर... :)
आपल्याला बाँ पनीरचा कंचा बी पदार्थ लयं आवडतो बघा... :)
पनीर पदार्थाच्या बाबतीत म्या लय हावरट,आधाशी...आणि जे काय असेल ते हाय.;)
कुठल्याही पदार्थात मला पनीर दिसले रे दिसले की मग... खी खी खी !!! ;) समजलेच असेल तुम्हाला मला कसं वाटेत असेल ते. ;)

(पोट पुजारी)
आम्ही सर्व प्रकारच्या पुजेत यक्सपर्ट हावोत !!! ;)