पाककृती

मटार पॅटीस

Primary tabs

भाजीचे साहित्य मटार दाणे अर्धा किलो कांदे २ छोटे चिरुन आल लसुण पेस्ट टोमॅटो १ बारीक चिरुन राई, जिर, हिंग, हळद, मसाला १/२ चमचा गरम मसाला मिठ तेल ओल खोबर कव्हरसाठीचे साहित्य: १ किलो बटाटे चांगले उकडून मिठ रवा किंवा बटरचा मिक्सरमधुन काढलेला चुरा. तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम वरील भाजीचे साहित्य घेउन तेलावर राई, जिर, हिंग ची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर परतवायचा. नंतर त्यावर आल लसुण पेस्ट, हळद व मसाला घालून मटार टाकायचा. आता वरती झा़कण ठेउन त्यावर पाणी ठेउन मटार वाफेवर शिजुन घ्यायचा. शिजला की बारीक चिरलेला टोमॅटो, ओल खोबर, गरम मसाला, मिठ घालुन थोडावेळ वाफवुन त्यावर खोबर घालुन गॅस बंद करायचा. Image removed. भाजी होत असतानाच बटाटे कुकरला किंवा टोपात चागले शिजवुन घ्यायचे व गरम असतानाच त्याची साल काढून स्मॅश करुन घ्यायचे. गरम असताना चांगले स्मॅश होतात. अगदी पिठाप्रमाणे बटाटा करुन घ्यायचा. पिठामध्ये चविपुरते मिठ घालुन एकदा हा लगदा चांगला मळून घ्यायचा. Image removed. पॅटीस करताना लिंबाएवढा बटाट्याचा लगदा घेउन त्याची मोदकासाठी करतो तशी वाटी करायची. Image removed. मग त्यात १ चमचा भाजी भरुन घ्या Image removed. आता ही भरलेली वाटी मोदक वळतो त्याप्रमाणे वळा Image removed. वळत वळत वरुन बंद करुन हलक्या हाताने दाबुन चपटी करायची. Image removed. आता हा पॅटीस रवा किंवा बटरच्या चुर्‍यामध्ये घोळवुन घ्या. Image removed. आता हे पॅटीस गरम तव्यावर मंद फ्लेम ठेउन शॅलोफ्राय करत ठेवा. आधी ५-६ पॅटीस करुन घ्यायचे मग तव्यावर टाकायचे म्हणजे गॅस व वेळ वाचतो. Image removed. हे घ्या तयार आहेत गरमा गरम पॅटीस. सॉस सोबत चांगले लागतात. Image removed. वरील पध्दतीने करताना वेळ जास्त लागतो. जर कमी वेळात करायचे असतील तर बटाट्याच्या लगद्यातच भाजी मिक्स करुन घ्यायची. Image removed. त्याचे कटलेट करुन मंद गॅसवर तळावेत. २ तास वरचा प्रकार चालु होता. कारण आमची फॅमिली मोठी तशी कॉन्टिटी ही मोठी. मी शेवटी कंटाळा आल्यावर खालचा प्रकार केलाय. ह्यांचा रंग छान आला पण चव ती नाही येत. Image removed. अधिक टिपा: बटाट्याच्या लगद्यात ब्रेडचा चुरा करुनही पिठ मळतात. त्यामुळे पॅटीस तुटत नाहीत. पण मी नेहमी नुसतेच करते कारण चवीत फरक पडतो. हे पॅटीस मका, तुरीचे दाणे तसेच इतर कडधान्य घालुनही करता येतात. जर मांसाहारी असाल तर हेच पॅटीस खिमा, करंदी घालुन करता येतात. तसेच रव्या ऐवजी अंड्यामध्ये घोळवुन तळता येतात.
अवलिया

मेलो ! मेलो ! मेलो !!

अरे ह्या जागुतैचा आयडी रद्द करा रे !!

आता रात्री कावेरीत जाताना मटार पॅटीस घेउनच जावे लागणार.

गणपा

कावेरी ????
पुनमला सोड्चिठ्ठी की काय ;)

कावेरी ????
पुनमला सोड्चिठ्ठी की काय

समुहाने (कुंपुगिरी) असेल तर पुनम आणि एकटा जीव सदाशिव असेल तर रोजचे कावेरी.

गवि

सध्या डायेटची भानगड नसती तर उद्याच आमच्या घरी हा मस्त प्रकार बनला असता.. :(

जागु

अवलिया अमृत मारते जिवंत व्हा.

राजकुमार ती कावेरी काय ?

गणपा यमाला बोलावताय की यम्मी आहेत पॅटीस ?

गगनविहारी आठवड्यातुन एकदा नसतो पाळायचा डाएट.

ते पाणवठ्याचे नाव आहे ग ;) गैरसमज नको.

बाकी हा पदार्थ चकण्यासाठी अतिशय उत्तम व भक्कम आहे असे आमचे अनुभवी मत आहे.

मेघवेडा

एकदम.. खल्लास.. आम्ही पहिल्या फोटोतल्या स्टेजपर्यंत पोहोचलो तरी खूप आहे! :D

रेवती

पाकृ व फोटू छान दिसतायत.
तू फ्रोझन मटार वापरलेस कि ताजे?

चिंतामणी

तेच घ्यावे. त्याची चव वेगळीच असते फ्रोजनपेक्षा.

ऑफसिजनला फ्रोजन वापरा.

सुहास..

ये हुवी ना बात !!

या पाकृ करिता व्यनी करणारच होतो ...रविवारची खादाडी फिक्स ग जागु ताइ !!

गवि

सुहास,
वडापावाऐवजी पॅटिसचीच गाडी लावूया काय? मी पण येतो भांडवलापोटी तवा आणि शेगडी घेऊन. गाडीचे तुम्ही जमवाल काय?
;)

वडापावाऐवजी पॅटिसचीच गाडी लावूया काय? मी पण येतो भांडवलापोटी तवा आणि शेगडी घेऊन. गाडीचे तुम्ही जमवाल काय?

गॅस दोघे मिळुन भरणार का? ;)

सुहास..

गॅस दोघे मिळुन भरणार का? >>>

अर्थातच (आम्ही काय ' गॅसदान' वाले वाटलो की काय या पर्‍याला ? )

असो .

गगनदा , गाडीच जमवुयात आणि तिथच गुरुद्वाराच्या शेजारीच टाकु या गाडी , सरदारकडे जाणारी काही मंडळी आपल्याकड व़ळतील !!

प्रकाश१११

की हाताची ही जादू ?
नि करामत त्या बोटांची
हे दिसते प्याटीस भारी
मन कासावीस होई

मज नको दाखवू बाई
हे असले काही बाही
नुसती छबी बघोनी
जीव कासावीस होई ...!!

छान आणि मस्त . मटार माझा जीव..!!

पिंगू

जीव गेला पाहून.. आता काय करु.. सध्या पी.जी मध्ये स्वंयपाकघर नाहीये.. :(
आता विकांतची वाट बघतोय. घरी गेल्यावर करुन बघता येईल..

- (प्याटिसप्रेमी) पिंगू

स्वानन्द

वा वा... रविवारी असे पॅटीस करायचा प्रयत्न करून बघतो

मनीषा

मस्तं मस्तं पॅटीस .

करुन बघायचा विचार करते आहे ...