पाककृती

झट्पट झन्झनित फिश करि...............

Primary tabs

(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि मला लिहिन्याचाही.......... ) झटपट तर्रिवाली फिश करी ....... मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या. साहित्य :- मासे पावून किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम टमाटर , १ चमचा मीठ, लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद... मसाला :- खोबर ,लसून ,आल , कोथिम्बिर ,१ टमाटर , १ चमचा मीठ, सर्वे साहित्य (न भाजता ) मिक्सी मधे थोड पानी घालून बारीक़ वाटुन घ्या . फोडनी : तेल आवडीनुसार घाला मी ३ मोठे चमचे घातले , त्यात जीर , कडीपत्ता , हिंग घालून तडतडवा , नंतर वाटलेला हिरवा मसाला घाला , १ चिरलेला टोमाटो घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या, झनझनित हव असेल तर थोड जास्ती लाल तिखट घाला ,थोड मीठ घालून पानी घाला ग्रेवी जाशी हावी तेवढी घट्ट / पातळ करून घ्या ,थोडीशी हळद घाला ,आता फिश चे तुकडे ग्रेवित सोडा ,८-१० मिनिट झाकण ठेवा , गरमागरम झनझनित तर्रिवाली फिश करी तैयार आहे ,भात , भाकरी वा चपाती कशाबरोबर ही वरपा.......... (आईची मोलाची मदत ) Image removed. Image removed. Image removed.Image removed.
पियुशा

फोटो मोबाइल वर काढले आहेत क्लिअरिटी बद्दल आधीच क्षमस्व !

टारझन

फोटो मोबाइल वर काढले आहेत क्लिअरिटी बद्दल आधीच क्षमस्व !

खुलाश्याबद्दल धन्यवाद. तोंड लाळावले.

जेवायला कधी बोलावताय ?

- षार्कमासा
चिंगळ्या पिंगळ्या माश्यांनी नाद करायचा नाय :)

टारझन

आता बोलवुन काय फायदा ? आता ते मासे कोणत्या तलावात पोहत असतील कोणास ठाऊक ...
पुण्हा कराल तेंव्हा माश्यांऐवजी कोंबडीचा बेत करा आणी पत्ता देऊन बोलवा :) (तोंडदेखले आमंत्रण नको )

- (खादाड) टारु
लाजला तो संपला

स्पा

वॉव.............

तोंडाला जाम पाणी सुटलंय..............
मस्त यार...............

गवि

टारझनशी सहमत. तोंडात पाणी आले. वाहिले अगदी.

तर्रीदार दिसतेय करी.
रंग खतर्नाक आहे.

अहा..

गणपा

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म |
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म || ...

चला आणा पाहु ताट पुढ्यात आता.

चिंतामणी

फारच भन्नाट. खायची तिव्र इच्छा बळावली आहे.

प्रकाश१११

मस्त लाल रंग . त्यावर तरंगणारी तर्री .
पेरलेली कोथिंबीर . कांद्याची पात
नि सोबत चपाती की [!!] ??
खूप छान नि ग्रेट.!!

आशिष सुर्वे

कालवणातला मासा म्हन्जे आम्चा 'कच्चा बिंदू' (इक प्वाईंट) बर्र का..
जल्ला तोंडात पानी तरारलं ओ..

कौशी

पाकक्रुती बघुन जाम भुक लागली.

पिंगू

युनिव्हर्सल निषेध... आम्ही पट्टीचे शाकाहारी असल्याने तर्रीचा जोरदार निषेध करत आहोत..

- शाकाहारी पिंगू

चिंतामणी

बोंगाली बाबुला विचारा अथव युरोपात विचारा, ते सांगतील मासा शाकाहारी प्रकारातच आहे.

(कोणिही XXXXXXXXXXचा क्षीण प्रयत्न वगैरे कॉमेंट्स करू नयेत. मिपाचा भाषेत "फाट्यावर मारण्यात येतील". )

निवासी भारतीय (आणि मत्स्यप्रेमी) .- चिंतामणी

चिंतामणी

हे वाचले आहेत का? ह्या आणि अश्या अनेक पाकृ मिळतील "पाककृती"वर क्लिक केल्यावर.

पाककृती मस्त झणझणीत दिसते आहे!
पण "चोपडा" मासा म्हणजे कोणता मासा ते कळलं नाही!!!
मला फक्त प्रियांका चोपडा माहिती आहे!!!
(ती ही रुचकर असावी!!;))
पण चोपडा मासा?
कॉलिंग जागु! कॉलिंग जागु!! कॉलिंग जागु!!!
:)

पिंगू

मला फक्त प्रियांका चोपडा माहिती आहे!!!
(ती ही रुचकर असावी!)

हाहाहा.... ही पिडांकाकांची आवड आहे...

अश्या कालवणाची उणे ५ ते १० तापमानात राहणार्या मला नितांत गरज आहे ती चक्षु मोदन करून भागवावी लागणार तर.

मस्त दिसतेय चित्रात