पाककृती

गणपा ह्यांची बेक्ड वांग्याची रेसिपी तसेच शॅलो फ्राय भरले वांगे.

Primary tabs

परवा गणपा यांची बेक्ड वांग्याची रेसिपी पाहीली आणि ही करायचीच असे मनाशी ठरवले. त्यांच्या सगळ्याच पाककृती म्हणा अस ठरवायला भाग पाडतात. घरी सकाळीच मोठ्या वांग्याची भेट आलेली हाही एक योगायोग होता. मग घरी जाताना भाज्या घेउन जाण्याचा खटाटोप केला. आणि खालील भरले वांगे दोन प्रकारे तयार केले एक बेक करुन आणि एक फ्राय करुन. खालील तयारी आधी करुन ठेवली Image removed. सगळी वांग्याचे दोन उभे भाग केले.एका वांग्यातील दोन भागांचा गर सुरीने काढुन घेतला Image removed. बाकीची कापलेली वांगी मायक्रोवेव्ह मध्ये २ - २ मिनीटे करत ७ ते ८ मिनीटे भाजुन घेतली. ह्या वांग्यामध्ये भरपुर बिया असल्याने मी त्या घेतल्या नाहीत. थोडा गर होता तो भाजीत टाकला. Image removed. भाजीचे साहित्य : वांगी ब्रेडचा चुरा (ब्रेड मिक्सरमधुन काढून) मटार दाणे कांदे घेताना गणपांना आठवलेला मुद्दा लक्षात आला कांदे महाग झाल्याचा. म्हणुन नाही घेतले मी पण तेवढाच वेळ वाचला. १ गाजर किसुन बटाटे बारीक कांद्यासारखे चिरुन फ्लॉवर बारीक चिरुन सिमला मिरची बारीक चिरुन टोमॅटो बारिक चिरुन आल, लसुण बारीक चिरुन हिंग, हळद, मसाला किंचीत साखर चविपुरते मिठ अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा गोडा मसाला (पण मला ह्यापेक्षा पावभाजी मसाला जास्त चांगला लागेल अस वाटत) तेल कढईत तेलावर आल लसुण टाकुन हिंग, हळद मसाला घालून त्यावर फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा, वांग्यातील गर ह्या भाज्या टाकल्या. ह्या भाज्या शिजत आल्यावर त्यात मिठ, गोडा व गरम मसाला, किंचीत साखर घालुन टोमॅटो व सिमला मिरची घातली. चांगली वाफ आल्यावर थोडा वेळ झाकण काढून शिजवली भाजी त्यामुळे ती पुर्ण सुकी झाली. आता बेक करुन गर काढलेल्या व कच्च्या वांग्याचे गर काढलेल्या वांग्याच्या वाटीत भाजीचे पुरण भरले. Image removed. वरुन ब्रेडक्रम्ब्स लावले. Image removed. आता बेक केलेली पुरण भरलेली वांगी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये १-१ मिनीट करत ४ ते ५ मिनीटे ठेवली. व कच्ची पुरण भरलेली वांगी तव्यात शॅलो फ्राय केली. Image removed. Image removed. ओव्हन नव्हता त्यामुळे मायक्रोवेव्हमधील वांग्याला एवढा भाजका वास आला नाही. त्यामुळे बेक वांगे खास वाटले नाही. गणपांनी सांगितलेच होते के मावेत तो फिल येणार नाही. पण वेळ वाचवायचा होता व निखारे करायचा कंटाळा आल्याने मी मायक्रोवेव्ह ट्राय केला. पण शॅलो फ्राय केलेले वांगे मात्र तोंपासु. खुच चविष्ट लागले.
गवि

जागुताई..तोंपासु पाकृ ऊर्फ श्यालो फ्राय वांगी, याचे फोटु का नाही दिले?

अशाच रितीने वांग्यांच्या कापाची काही फर्मास कृति द्याल तर मजा येईल..(तेच ते सुरमई कापांसारखे दिसतात ते..मी लोणच्याचा मसाला बेसनात मिसळून ते करण्याची कृति केली. लागते झकासच पण तेल पिते..)

ईयर एंडिंगला घरी बनवावे असे म्हणतोय.

सुहास..

जोरदार !!

अवांतर : पाककला कौशल्याची स्पर्धा चालु आहे सध्या , गणपा वि.जागु वि. स्वाती दिनेश वि. खादाड अमिता वि. रश्मी दाते

गवि

जज्ज कोण आहेत ?

आय मीन जज्जेस प्यानेल?

अन्नूजी असणारच. इतर दोन कोण आहेत ?

टारझन

गणप्या ने हीच पाककृती दिली होती , मग परत स्वत: ती पाकृ करुन तीच पुन्हा टाकण्याचे प्रयोजनच कळाले नाही.
माझ्या माहिती नुसार जागु कडे ऑलरेडी खुप व्हेरियेशन्स आहेत. पण असा रिपिट मामला खटकला :)
उद्या गणप्याची पाकृ पाहुन २० लोकं इन्स्पायर झाले आणि विसी लोकांनी पहिलं पाण त्याच पाकृ ने भरलं तर ?

असो . राग नसावा.

सुहास..

पण असा रिपिट मामला खटकला >>>

पेटलं !! पेटलं !!

जागु

सगल्यात खालचा फोटो शॅलो फ्रायचा आहे. आणि सगळ्यात आधी मी गणपा यांचे आभार मानते. त्यांच्यामुळे ही पाककृती मला करता आली.

जागु

गणप्या ने हीच पाककृती दिली होती , मग परत स्वत: ती पाकृ करुन तीच पुन्हा टाकण्याचे प्रयोजनच कळाले नाही.
माझ्या माहिती नुसार जागु कडे ऑलरेडी खुप व्हेरियेशन्स आहेत. पण असा रिपिट मामला खटकला

मला वाटलच मिपावर हे वाद उपस्थित होणारच म्हणुन मी शिर्षकातच गणपा यांची पाककृती म्हणुन लिहीले आहे.

वेगळी रेसिपी टाकण्याच प्रयोजन :
बरेचजणं एकदा वाचलेली पाककृती परत वाचत नाहीत. त्यामुळे पुढील आयडीयाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून नविन धाग्यावर दिली.

टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

-वादाणुकर्ण
बाकी चालु द्या

गणपा

सगळ्यांकडे ओव्हन असतोच अस नाही.
त्यामुळे जगुताईंनी ही रेसिपी ट्राय करुन, त्यात बदल करत इथे नव्याने सादर केल्या बद्दल आभार.

माझी कुणाशीच स्पर्धा नाही. उलट मीच इथुन नव नव शिकत असतो.
त्यामुळे हा वाद न वाढवल्यास मी आभारी राहिन. :)

मस्त कलंदर

झक्कास.. एक आधी गणपा छळतो, आणि ही जागु त्यात भर घालतेय.. :-(

शुचि

गणपा सिग्नेचर कृतींचा वेगळा विभाग सुरू करावा अशी समं ना विनंती

रेवती

जागुतै, शॅलोफ्राय वांगे आवडले. फोटू दिले की.....इनो.;)
वांगीभात करताना आपण वांग्याचे तुकडे परततो त्याऐवजी भरल्या वांग्याप्रमाणे छोट्या वांग्यांना चिरा देवून थोडा मसाला भरून अख्खी वांगी भातात घालावित असे वाटते. हा प्रयोग करायचाय पण सध्या चिंटुकली वांगी येतच नाहियेत.

मदनबाण

इतक्या वांग्याच्या पाकॄ वाचुन मला वांगी प्रेमाचे भरते आले !!! ;)

(कॄष्णा काठची वांगी चाखणारा)

जागु

रेवती कालच पाहीली मी चिटुकली वांगी. बघ असतील बाजारात.