पाककृती

उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप

Primary tabs

लागणारे साहित्य: Image removed. सुरण मिठ तुप चिंच कोळ पाककृती: सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते. सुरणाची पातळ चकती काढून घ्या. Image removed. चकतीचे कापुन त्रिकोण करा. तुम्हाला डिझाईन येत असतील दुसर्‍या त्या काढल्यात तरी चव एकच राहणार आहे. Image removed. ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या. Image removed. उकडल्यावर भांड्यातले पाणी काढून सुरणाच्या फोडी ताटात काढा. त्याला मिठ चोळा जखमेवर चोळतात तसे. Image removed. पॅनवर तुप किंवा तेल टाकुन खरपुस तळून घ्या. Image removed. पाहीजे असल्यास्/वेळ असल्यास्/आवड असल्यास सजावट करा. Image removed. अधिक टिपा: तुम्ही मिठाबरोबर मिरचीपुडही घालु शकता. उपवास नसेल तर मिरपुडही लावता येते. मिरपुडचे काप खुप छान लागतात. उपवासासाठी करताना जर शिंगाडापिठ असेल तर भजी करु शकता. वरीच्या तांदळात काप घोळवुन शॅलोफ्राय करु शकता. तेल टाकुनही करु शकता.

चतुर्थी कधी आहे ? हा प्रकार घरी करायला लावलाच पाहिजे.

त्याला मिठ चोळा जखमेवर चोळतात तसे.

तुला ग फार अनुभव ;)

सुहास..

तुला ग फार अनुभव >>

नाही तर काय रे पर्‍या ? तो गणपा जखमा करतो आणि ही जखमावर मीठ !!

कधी एकदा या इडली-डोसातन बाहेर येतो काय माहीत ?

जागु

तुला ग फार अनुभव
हो मासे टाकुन मी बर्‍याच जणांच्या जखमांवर मिठ चोळते :smile:

गणपा

मस्त :)
सुरणं मटणात टाकुन चापणारा ;)

गवि

आहा..

कुरकुरीत आणि खुसखुशीत यांचं झकास मिश्रण असेल हा पदार्थ.

तेवढे वांग्याचे काप टाका ना जागुतै..

जागु

वांग्याचे काप मला दर आठवड्याला करायला लागतात. लेकीला डब्यात देण्यासाठी करते. तिचाही खुप आवडता प्रकार आहे. पुढच्या आठवड्यात टाकतेच.

वांग्याचे काप मला दर आठवड्याला करायला लागतात. लेकीला डब्यात देण्यासाठी करते. तिचाही खुप आवडता प्रकार आहे. पुढच्या आठवड्यात टाकतेच.

नाही नाही !
आज उद्यात टाक प्लिइइइइइइइइइइइइइइइइइइज. म्हणजे रविवारी करता येतील ;)

प्राजु

मस्तच..!
वेगळा प्रकार. सुरणाचे काम कधी खाल्ले नव्हते.
करून बघेन. इथे सुरण मिळाले तर ..अर्थात!

चिंतामणी

सुरणाचे कबाब बनण्याची कृती माहित असेल तर ती सुध्दा दे.

सुहास..

जागु ताई ,

ज ह ब ह रा !!

अवांतर : तुझा आणि त्या गणपाचा पाकृ-मेंदु हायजॅक करावा म्हणतो

जागु

सुरणाचे कबाब थोड्या दिवसांत देतेच.