जे न देखे रवी...

रस्ता

Primary tabs

भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले

तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले

आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले

शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले

सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?

मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले?

हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले

शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्यांने मोजले !

अनिरुद्ध अभ्यंकर

अभिज्ञ

कविता आवडलि...
रस्ता छान आहे.

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले

तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले

हे आवडले.

पुढील लेखनास शुभेच्छा.

अबब.

अनिकेत

काव्य छानच, पण.....

काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात.
विषय मात्र गझलेस अगदी योग्य....

अनिकेत

चतुरंग

हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले

शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्यांने मोजले !

हे आवडलं!

चतुरंग

मदनबाण

अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!!

शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
> मस्त.....

(आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु)
मदनबाण

प्रमोद देव

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले

मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले?

शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्यांने मोजले !

हे विशेष आवडले.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले

हायsss !! बढिया.

सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?

खरं आहे! मान गये उस्ताद!

शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्यांने मोजले !

=D> =D> =D> =D> =D>

विसोबा खेचर

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले

आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले

वा अनिरुद्धा! सुंदर गझल...

तात्या.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर