पाककृती
गोळ्याची आमटी.
Primary tabs
साहित्यः-१)एक वाटी बेसन. २)दीड कान्दा. ३)दोन हिरव्या मिरच्या.
४)कोथिम्बिर ५)चिन्चेचा कोळ. ६)दोन वाट्या किसलेले ओले खोबरे.
७)१/२ चमचा मिरची पूड. ८)४-५ मिरी ९)चविपुरता गुळ.
१०)१/२ चमचा हळदपुड ११)मिठ १२)तेल्(खोबरेल असल्यास उतम)
कृती:- एक कान्दा,मिरच्या,कोथिम्बीर कापुन घ्यावे.त्यात बेसन्,मिठ्,थोडी हळद घालुन एकत्र करुन त्याचे छोटे गोळे
करावे.एक वाटी खोबरे,मिरी,१/२ कान्दा बारीक वाटुन घ्यावे.उरलेल्या एक वाटी खोबरयाचा रस काढावा.
एका भान्ड्यात तेल घेउन त्यात उरलेला १/२ कान्दा बारीक चिरुन फोड्णीला घालावा.चिन्चेचा कोळ्, मिरची
पूड्,हळदपूड्,चविपुरते मिठ(गोळ्यात पण मिठ घातलेले आहे याची जाणिव ठेवा)व पाणि घालून शिजत ठेवावे.
उकळी आली की त्यात बेसनाचे गोळे सोडावे.गोळे शिजून वर आले की नारळाचा रस घालुन २ मिनिटानी
आमटी खाली उतरवावी.गोळ्याची आमटी तय्यार.
ज्योती ताई, जर हेच बेसनाचे गोळे तळून वापरले तरीही चालतील ना..
- पिंगू
मी तसे कधी केलेले नाहित्,पण माझ्या माहितीप्रमाणे गोळे तळले तर त्याची ग्रेव्ही वेगळ्या प्रकारची बनवावी लागेल हि
कोकणी पद्द्तीची दिलेली आहे.
कुठाय?
मस्तच. या हवेत गरम गरम भाताबरोबर छान लागते.
पण तुम्ही फटु टाकण्याची प्रथा न पाळल्याचा निषेध.
पण फटु नसल्याने प्रतीक्रीया आल्या आहेत असे वाटते.
गगनविहारीना आजीच्या हातच्या गोळ्याच्या आमटीची आठवण झाल्यामुळे लगेच पा.कृ.टाकली घरी केलेली
नव्हती त्यामुळे फोटु टाकता आला नाही.
पण फटु नसल्याने प्रतीक्रीया आल्या आहेत असे वाटते. हे वाकय पुढील प्रमाणे वाचावे.
पण फटु नसल्याने प्रतीक्रीया कमी आल्या आहेत असे वाटते.
गोळे आमटीत घालण्यासाठी बनवले की आधीच मी पळवत असल्याने आजी खंडणी काढून ठेवावी तसे आधीच एका वाडग्यात काढून ठेवायची. "खा यातले हवे तेवढे आणि आता बाकीच्यांना हात लावू नको."