पाककृती

गाजर सूप

Primary tabs

सध्या बाजारात उत्तम गाजरे आहेत, सारखी कोशिंबिर किती करणार? आणि फिल्मी गाजर का हलवा सुध्दा वजन आणि साखरेला मारकच ना.. म्हणून आमच्या सुझानची खासियत हे गाजर सूप-

साहित्य- ५-६ मध्यम गाजरे, १ लहान कांदा, २ पेरं आल्याचा तुकडा, ३-४ मिरे, २ लवंगा, दालचिनीची एक मोठी काडी,ड्राय बेसल लिव्ह्ज,मीठ
कृती- गाजरांची सालं काढा. मोठे तुकडे करा. कांदा सालं काढून अर्धा करा. गाजराचे तुकडे आणि कांदा एका मोठ्या उभट पातेल्यात किवा कुकरात घ्या. त्यात आले,मिरी,दालचिनी,लवंगा इ. सर्व मसाला घाला आणि उकडा.
हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या किवा हँड ब्लेंडरने घोटा. दाट, रवाळ पल्प तयार होईल. गरजेनुसार गरम पाणी घाला. मीठ घाला.बेसल लिव्ज घाला. खळखळून उकळू द्या.
कोथिंबिरीने सजवा.
गाजराचे सूप तयार आहे.

हायला !!
काय शॉल्लेट दिसतय.

(काही नालायक लोक पूनम मध्ये कसली कसली सूपं पित असतात, त्यांना हे पण ट्राय करा म्हणाव.)

नरेशकुमार

बाहेरचं आयतं हादाडन्यात जी मजा आहे ती घरी करुन खान्यात नाही, हे त्याना माहीत असावे.

छोटा डॉन

जबरदस्त !!!!
एकदम कातिल फोटो आहे, भुक लागली एकदम.

- छोटा डॉन

जागु

खुपच छान.

ते लवंग, मिरी, दालचीनी ह्यांची वेगळी फोडणी दिली तर ? म्हणजे आधी गाजर आणि कांदा वाफवुन त्याची प्युरी किंवा स्मॅश करायच. मग तुपावर वरच्या गरम मसाल्याची फोडणी द्यायची. म्हणजे लहान मुलांच्या तोंडात नाही येणार.

सहज

मस्तच!

अश्याचप्रकारे अजुन एक दोन काँबीनेशन्स
१) दुधी भोपळा + बटाटा व वर दिलेले इतर इतर घटक
२) बीट + टोमॅटो व वर दिलेले इतर इतर घटक

देखील मस्त सुप बनतात!! थंडीच्या दिवसात अशी सुप्स प्यायची मजा वेगळीच!

सुनील

थंडीच्या दिवसात अशी सुप्स प्यायची मजा वेगळीच!

थंडीच्या दिवसात सहजराव (जहाल आणि मादक सरबताऐवजी) सूप पितात हे वाचून डोळे पाणावले!

अवलिया

मस्त !

गणपा

मस्त
वरुन जर साजुक तुपातली, काळीमीरी +ठेचलेल्या लसणाची फोडणी असेल तर लज्जत नक्कीच वाढेल. :)

आवांतर : ते केसु आणि दिनेश तिकडे डाएटचा बोर्‍या वाजवत असताना तुझा हा उतारा झक्कासच ;)

केशवसुमार

आठवडाभर हे असलं डायेटवालं खाल्लं की विकांताला डायेटला विश्रांती द्यावी लागते..;)
बाकी सुप एकदम फक्कड होते ..टूक टूक..

पिंगू

हा प्रकार मस्त वाटला. सत्वयुक्त गाजर गाळून घेतला नाही हे उत्तम..

- पिंगू

गवि

रंग छान आहे. कडवट नसेल ना पण ?

रंग छान आहे. कडवट नसेल ना पण ?

गवि गवि गवि... अहो बाटलीतल्या वेगवेगळ्या रंगाच्या द्रव्यांबद्दल कधी हा प्रश्न पडलाय का तुम्हाला? मग उगाच सूपाबद्दल कशाला शंका ? ;)

तळीराम

गवि

नाही..म्हणजे तसं असेल तर सुपासोबत काहीतरी चकणा चावायला घेऊन बसायला बरं म्हणून विचारलं. ;)

- गळिराम

सुत्रधार

असेच बिट वापरुन पण सूप अगदी छान रन्गाच होत्त....

यकु

करून पाहायला पाहिजे..
गाजराचा फ्लेवर राहात नाही ना पण?
टोम्याटो सूपही असंच करतात काय?

मेघवेडा

वा! जिरं, आलं-लसणीची फोडणी देऊन भातावर घ्यायला मस्तंय.. गाजराचं सार!

मितान

स्वातीताई, माझ्या लेकीचं फार आवडतं सूप आहे हे. आता तुझ्या पद्धतीने करून पाहीन.

थोडं वेगळं करते मी. मसाले न घालता थोडी जायफळ पावडर आणि मिरपूड घालायची.

रेवती

सूपाचा रंग छान आलाय. दिसायला टोमॅटो सूपसारखे वाटते आहे.
डाएट पाकृ दिल्याबद्दल आभार.

प्राजु

मस्तच.
मी यात टोमॅटो सुद्धा घालते थोडा. आता नुसतेच गाजराचे करून बघेन.

मदनबाण

आह्ह... :)

अवांतर :--- आयटी कंपनी मधील मॅनेजर मंडळी रोज गाजराचं सुप पीत असावीत, कारण बरेच टीम मेंबर्स त्यांचा मॅनिजर फकस्त गाजरंच दाखवतो असे म्हणताना मी ऐकलं आहे. ;)

स्पंदना

म्च म्च !! या फोटोला हात लावुन थोडस चाखायची सोय होइल का इथे?

सुनील

सूप छानच!

वर सहजराव म्हणतात तसे बीट घातले तर, मस्त रंग येईल!

रेवती

आजच हे सूप केले होते.
अगदी वेगळी आणि छान चव लागते.
माझ्याकडून थोडे आले जास्त झाले ते पुढच्यावेळेस कमी घालीन.:)