पाककृती

शेवयाची खिचडी

Primary tabs

शेवयाची खिचडी ही पौष्टीक, डायट फुड आनि वन डिश मील आहे. साहित्य- १ वाटी शेवया १ कान्दा बारिक चिरललीला २-३ मिरच्या मूठभर शेन्गदाणे १/४ वाटी मुगाची डाळ भिजवलेली (असल्यास) तेल्,जिरे,मोहरी,मीठ्,ह्ळद क्रुती- गॅस ऑन करुन त्यावर कढइ ठेवा. त्यात शेवया टाकुन त्यात थोडेसे तेल टाकुन त्या भाजा.रन्ग ब्राउन येइपर्यन्त भाजा. Image removed. आता ताटात काढुन ठेवा कढइमधे तेल टाका आनि तापल्यावर मोहरी-जिरे टाका. आता मिरची आनि कान्दा टाका. कान्दा परतत आल्यावर त्यात मुगाची डाळ भिजवलेली टाका. आनि ५ मिनिटे झाकन ठेवुन वाफ येउ द्या. मूग शिजल्यासारखे झाले असतिल तर त्यात मीठ्,हळद टाका. आता त्यात १ वाटी पानी टाका आनि त्याला उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया टाका. झाकन ठेवुन सगळे पानी आटुन जाउ द्या. होत आल्यवर किन्वा ताटात वाढ्ताना १ चमचा चान्गले तुप टाका जास्त छान लागते. आता ताटात घेउन पोटात जाउ द्या Image removed.
पिंगू

चला पोह्यांना पर्याय मिळाला.. चांगली आहे खिचडी..

- पिंगू

पियुशा

ए हि तर माझि आवडति खिचडि आहे यम्मि !

गवि

पहिल्यांदाच ही आयडिया पाहिली. आजच सकाळी दलिया-उपमा ब्रेकफास्टला होता. तेव्हा विचार आला होता की यात तूरडाळ घातली तर?

शेवयांचा उपमा / ख्रीर केलेले आहे. हा मात्र एक नवा प्रकार झाला.

सहज

करुन पाहीले पाहीजे.

टारझन

विकपॉइंट पकडला आहे माझा . निषेध !!!

- (शेवया न नुडले प्रेमी) टांग शुं वांग

सर्व प्रतिक्रिया देनार्यान्चे अनि वाचकान्चे आभार

मला वाटले नव्ह्ते कि ही बर्याच लोकान्साठी नवीन रेसिपी असेल
असो ट्राय करुन सान्गा
@ पिन्गु
सहमत आहे
@पुपे
तुम्हाला खरड केलिये