पाककृती

नारळाचे मॅकरुन्स्

Primary tabs

असहकार यांनी त्यांच्या मुलीसाठी बिन गव्हाच्या केकची रेसिपी सुचवण्या बद्दल धागा काढला होता. तिला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले.

ही काही केकृ नाही. पण केक सदृष्य आहे म्हणुन देण्याचा मोह आवरता येत नाही.

साहित्यः


एक बाऊल नारळाचा चव.
१/३ कप साखर/पिठीसाखर.
३-४ मोठे चमचे मैदा.
व्हॅनिला इसेंस.
२ अंड्यांतला पांढरा भाग.
चिमुटभर मीठ.

कृती:


एका भांड्यात अंड्यांमधला फक्त पांढरा भाग वेगळा करुन थोडासा फेटुन घ्यावा.
मग त्यात बाकीचे जिन्नस घालुन चांगले एकजीव करुन घ्याव.


तयार मिश्रण साच्यामध्ये ओतुन घ्याव.


ओव्हन २०० ते २२५ °C वर ठेवुन, २०-२५ मिनिटे बेक करत ठेवाव.

गणपा

एक सांगायच राहिलं.

मैदा नावापुरताच घातला आहे. पण त्या ऐवजी कॉर्न फ्लॉर वापरल तरी चालेल.

रेवती

अरे, पण मैदा आहे ना यात!
तोही न घालता काय करता येइल?
बाकी पाकृ फक्कड आहे.
फोटू मस्त आलेत.

कच्ची कैरी

गणपा तुम्ही ग्रेटच आहात ,आता मला पाककलेत काही अडचण आली तर मी तुम्हालाच विचारनार हं!

विजुभाऊ

गणपा शेफ...
तुम्हाला आता गणपाशेठ ऐवजी गणपाशेफ असेच बोलवणार

स्पंदना

अरे हे केल असत ना मी मग? उगाच सकाळभर केक करत बसले .

चलो नेक्स्ट टाइम हे बनवुन पहाते.

अवलिया

वेलकम ब्याक !!! :)