पाककृती

रंगिबिरंगी पनिर बुरजी.

Primary tabs

लागणारे साहित्य: पनिर लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन) २-३ हिरव्या मिरच्या चिरुन १ ते २ मध्यम कांदे चिरुन मटार अर्धा वाटी कोथिंबीर थोडी चिरुन मिठ १ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस. तेल थोडा गरम मसाला ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या Image removed. हे काही लागणारे वरील जिन्नस Image removed. क्रमवार पाककृती: पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या.म्हणजे सोप्या शब्दात कुस्करुन घ्या हो. Image removed. तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिरच्या घालुन शिजु द्या. मटार लवकर शिजावा म्हणुन फोडणीत घातला आहे. Image removed. मटार शिजत आला की त्यात टोमॅटो घालुन थोडा शिजवा. Image removed. आता सिमला मिरच्या (तिन्ही रंगाच्या), पनिर त्यात घालुन परतवा. Image removed. एक वाफ आणुन त्यात मिठ, गरम मसाला, कोथिंबीर घाला व परत एक वाफ आणुन परतुन गॅस बंद करा. Image removed.
कवितानागेश

भाज्या शिजवतानाच त्यात थोडे थोडे मीठ घालत राहिले की, चव पण येते आणि रंग पण टिकतो.
सिमला मिर्ची करताना मे नेहमी असंच करते.

गणपा

पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या जागी अंडे कल्पले. :)
(पराला अंडे चालते का?)

सहज

पराला अंडे चालत नसल्यास टोफू घालून, टोफू चालत नसल्यास, पांढरा भात घालून :-)

जागू तै छान दिसतेय भाजी.

स्वाती२

पनीर फक्त ग्रेव्हीत आवडते. त्यामुळे मीही अंडीच वापरते.

जागु

मुलखावेगळी, गणपा, सहज धन्यवाद.

सहज आता थोड्या वेळाने खोबरे, तांदळाचे पिठ, साबुदाणा, दुध ह्या गोष्टीपण येतील.

दीविरा

छान आहे दिसायला :) पण मला पनीर आवडत नाही.दूसरे काहितरी घालीन त्यात.

:)

स्वाती२

फेटा चिज चालेल ह्यात. पण चेडर वगैरे वितळून कायच्या काय होईल.

मदनबाण

वा... पनीर !!! खी खी खी. :)

पण
यक
प्रश्न
पडला
हाय
.
.
.
बुरजी ? की भुर्जी ?

(पनीर प्रेमी)

रेवती

दोन्ही शब्द बरोबर आहेत.
उगीच शंका कुशंका विचारू नकोस बाणा.
समोर ताटात येइल ते आनंदानं खायची सवय लावून घे.;)

एकदम छान.......रंगीबेरंगी...मुले खुश...सर्व भाज्या मुलांनी खाल्ल्यामुळे आपणही खुश...

रेवती

चवीला कशी लागेल याचा अंदाज येत नाहिये.
रंगीबेरंगी फोटू मात्र छान आलाय.

प्राजु

फोटो कातिल आहे..
करून बघेन.
मला अंडे , पनीर दोन्ही चालते.. त्यामुळे दोन्ही करून बघेन. :)

चिंतामणी

पाकृ फोटो सगळे छान आहे.

पण सिमिचे प्रमाण जास्त झाले असे वाटते.

जागु

सगळ्यांचे धन्यवाद.
चिंतामणी मी प्रत्येकी अर्धी सिमला मिरची वापरली आहे. पण पनीर भरपुर होत.

गवि

वा..एकदम शाकाहारी ?

पण मस्तच..

लवंगी

पनीर्-अंडे असे दोन्ही एकत्र टाकून करून पाहिन.. ;)

मी पनीर-३ रंगाच्या सिमला मिरचीची अशीच भाजी करते पण सगळ जूलीयन कापून घेते आणी पनिर कुस्करण्याऐवजी छोटे-छोटे तुकडे घालते..