पाककृती
भरलेली पापलेट
Primary tabs
साहित्यः
२ मध्यम आकाराची पापलेट,
१/२ नारळाचा चव,
३ हिरव्या मिरच्या,
पाव चमचा हळद,
१० लसूण पाकळ्या,
थोडेसे आले,थोडासा पुदिना
१ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,
१/२ लिंबाचा रस,
१/२ वाटी तांद्ळाचे पीठ,
तेल.
कृती:
पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी.
वरूनही आड्व्या चिर्या द्याव्यात.
नारळाचा चव ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी.
हल्क्या हाताने पापलेट तांदुळ्याच्या पिठीत घोळ्वून फ्राय पॅन मध्ये तळुन घ्यावे.
खल्लास!
दुसरे शब्द नाहीत...!
आपला,
तात्या पेडणेकर.
पापलेटांच्या ऐवजी चायनीज एगप्लांटस (चिनी लांब वांगी) घेतलीत तर हीच पाककृती व्हेगन लोकांनाही आवडेल.
किंवा, अधिक जहाल काही हवे असेल, तर सख्याला विचारा. "ओळखा पाहू" म्हणेल तो !
-- सर्किट
तुम्ही ही कृती करुन पहा .मग मला कळ्वा.
वृषाली
छान पाकृ
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
वाचुन च तोंडाला पाणी सुटलं..
मनस्वी,
शॅलो फ्राय करायचं. ( मासे नेहेमीच शॅलो फ्राय करावेत.)पेस्ट पुरेशी शिजते.
धन्यवाद फुलवा!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
श्रावण संपल्या संपल्या भरल्या पापलेटाची बहारदार पाककृती मिपावर दिल्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
पापलेटाच्या पोटात भरायच्या हिरव्या चटणीत थोडा पुदीनाही पापलेटाच्या आयुष्याचे सार्थक करतो.
खरचं की बरेच दिवसात पापलेट आणला नाही.
काकांशी सहमत थोडा पुदीना मजा आणेल.
धन्यवाद वृषाली ताई!
फारच छान.
आवड्ली पाकक्रूती.
आभार.