पाककृती

शेपूभात (फोटो)

Primary tabs

स्नेहश्रीताईंनी दिलेली पाकृ येथे वाचावी.

तांदूळ धुवून घ्या.

शेपू बारिक चिरुन घ्या.

लोण्यात मिरे,लवंग्,लसुण परतून घ्या. नंतर कांदा परतून घ्या.

त्यात शेपू घालून परता.

हे बाजुला काढून लोण्यावर धुवून ठेवलेले तांदूळ परतून घ्या.

त्यात परतून घेतलेला शेपू मिसळा.

चवीनुसार तिखट्-मिठ टाका.

त्यावर ४ वाट्या आधणाचे पाणी घालुन भात शिजवा.

लोणकढे तुप सोडून खायला घ्या.

कवटी

कवटी

(शेवटचा फोटो डिफोकस्ड आहे!)

माझी गळणारी लाळ सांभाळण्याच्या नादात फोकस चुकला. ;)

बाकी प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

कवटी

चतुरंग

लाळ सांभाळण्याच्या नादात फोकस चुकलाय की व्ह्यू फाईंडरवर लाळ पडल्याने फोकस हरवलाय ही बाब इथे गौण वाटते, दिलेल्या कृतीबरहुकूम पदार्थ करुन बघण्याचे डेडिकेशन महत्त्वाचे! B)

(अवांतर - माझे बाबा म्हणतात की भाताचे सतराशे साठ प्रकार केलेत तरी बर्‍याचदा 'अरेच्या, हा तर फोडणीच्या भातासारखाच लागतोय की!' असे होते. ;))

चतुरंग

विशुमित

(अवांतर - माझे बाबा म्हणतात की भाताचे सतराशे साठ प्रकार केलेत तरी बर्‍याचदा 'अरेच्या, हा तर फोडणीच्या भातासारखाच लागतोय की!' असे होते. ;))

-- +1111

पण तरी ही असा कलरफुल भात खूप आवडतो..
अगदी छान सुटसुटीत कृती दिली आहे.

पांथस्थ

लोकांच्या पाकृंचे फोटू द्यायचे ह्यो तर आमचा धंदा. हित बी कॅम्पीटिशन आली व्हय. आता वो काय करायचं?

असो, कवटिभौ मिलबाटके खायेंगे. शा.पा.कृ. तुमच्या कडे मा.पा.कृ. आमच्या कडं? कस्सं? :)

---

बाकी छान सुरवात. येउ द्या!

(जेवण झाल्या झाल्या हि पाकृ बघितली त्यामुळे लाळ टपकलि असे म्हणु शकत नाहि त्याबद्दल मंडळ दिलगीर आहे ;) )

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

टग्या (not verified)

सुरुवातीच्या शेपूच्या चित्रांतला शेपूचा रंग फारच फिका दिसत आहे.

शेवटचे 'कवटी' असे शीर्षक असलेले चित्र कोठे आहे?

यशोधरा

>>चे 'कवटी' असे शीर्षक असलेले चित्र कोठे आहे?

=))

स्नेहश्री

भात केलात बघुन खुपच आनंद झाला.
फोटो ही छान आले आहेत.
धन्यवाद.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी