जे न देखे रवी...

अतिशय फालतु विनोद

Primary tabs

२ मग एकमेकांना काय म्हणतिल ?

----- काय मग कसं काय?

तिकडुन एक तिसरा मग आला. त्याने त्या दोघांना काय विचारलं असेल ?
------काय मग, मगाशी काय बोलत होतात?
=======================================
महाराज आणि राणीसाहेब पत्ते खेळत असतात.
महाराज : कोण आहे रे तिकडे?
नोकर : हुकुम महाराज .
महाराज : इस्पिक
=======================================
एकदा एक गरोदर स्त्री डॉक्टर कडे जाते.
डॉक्टर विचारतात, "कितवा महिना?"
ती म्हणते, "आठवा"
डॉक्टर म्हणता, "मी कसा आठवु? तुम्हीच सांगा."
=======================================

मनस्वी

माँसाहेब: "शिवबा.."

शिवबा: "काय माँसाहेब..?"

माँसाहेब: "काही नाही.. सहज हाक मारली...!"

इनोबा म्हणे

एका व्यक्तीने डॉक्टरांना फोन केला आणि म्हणाला-"डॉक्टरसाहेब अलिकडे मला संडासला होत नाही."
डॉक्टर म्हणाले-"मग पलीकडे बैस."

(हसायदान) -इनोबा

मनस्वी

(स्थानिक) ताज्या बातम्या: एक २ आसनी विमान पंजाबमधील एका स्मशानात कोसळले, स्थानिक रहिवाश्यांना आत्तापर्यंत ५०० मृतदेह सापडवण्यात यश आले आहे.. खणण्याचे काम अजून चालू आहे.

चतुरंग

डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो.
तोच पहिला पेशंट असतो.
कंपाउंडर : हं, आपली काय तक्रार आहे?
पेशंट : मला दोन दोन वस्तू दिसतात.
कंपाउंडर : हे सांगायला तुम्ही चौघे चौघे का आलाय?
पेशंट : ???
तेव्हढ्यात जोरात दार ढकलून आत येत डॉक्टर : अरे केवढी गर्दी केली आहेत, जरा बाजूला व्हा!!

चतुरंग

एकदा एक पेशंट डॉक्टरांना म्हणतो,
पेशंट : डॉक्टर, मला 'फ' म्हणता येत नाही.
डॉक्टर : अरे तु तर आत्ताच 'फ' म्हणाला....
पेशंट : नाही डॉक्टर, तुम्ही 'फ'मजला नाहीत मला काय म्हणायचय ते......

- छोटी टिंगी ;)

मनस्वी

एक jigsaw puzzle मोठ्या मेहेनतीने पूर्ण केल्यावर लालू ते आपल्या मित्राला दाखवतात.

"हे पूर्ण करायला मला फक्त ५ महिने लागले!", लालू फुशारकी मारत सांगतात.

मित्र आश्चर्याने म्हणतो, "बापरे! ५ महिने म्हणजे खूपच झाले!"

"यडाच आहेस!".. लालू म्हणतात.. "जरा box वर नीट वाच, त्यावर लिहिलय - ५ ते ७ वर्षे!"

अमेरिकेत लाइट गेली,

तर तात्काळ इनव्हर्टर लावतात…

ऑस्ट्रेलियामध्ये लाइट जाते,

तेव्हा ऑस्ट्रेलियन लोक इलेक्ट्रिक ऑफिसला फोन लावतात… लाइट का गेली याची चौकशी करतात..

जपानमध्ये लाइट जाते,

तेव्हा ते लोक फ्युज चेक करतात…

आणि आपल्याकडे लाइट गेली,

तर आधी घरातून बाहेर येऊन बघतात- मग म्हणतात- सगळ्यांचीच गेली आहे ना? मग येईल!!

http://marathivinod.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0…

वेल्लाभट

हे काव्य रूपी विनोद समजावेत काय? :D

पण भारी मजा येते वाचताना.... येऊ द्यात !