जे न देखे रवी...
परीचे पशुधन
Primary tabs
परीचे पशुधन
*****************
परीच्या गोठ्यात गोगलगाय
तिच्या दुधाची चंदेरी साय
शिंगे मऊमऊ म्हणून काय
धोक्याचे तिच्या पोटातले पाय
***
परीच्या छतातलं चिमणीचं घरटं
लखलख काचेचं चकचक करतं
चिमणीच्या चालतो आराम मस्त
गरजेच्या वेळी तेलच नसतं
***
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा
बाबड्याला लागतो खुराक थोडा
लगाम न लागे, कधी न ओढा
उधळे तेव्हा, कधी न झोडा
***
परीच्या झाडावर पराचा कावळा
नका रे समजू कावळ्याला बावळा
कोकलतो कोहळा असल्यास आवळा
मागून माजतो गोंधळ सावळा
*****************
हि दोन्ही पद्ये खूप खूप आवडली... :))
एकदम मस्त!!!
शब्द इतके सहज, नादमय, सोपे आहेत की लगेच तोंडात बसतात :) पुलेशु
-ऋषि़केश
मानव या पशुसाठी असलेले हे विचारधन आहे.
प्रकाश घाटपांडे
शिंगे मऊमऊ म्हणून काय
धोक्याचे तिच्या पोटातले पाय
हा हा हा! मस्तच... :)
तात्या.
परीच्या गोठ्यात गोगलगाय
तिच्या दुधाची चंदेरी साय
शिंगे मऊमऊ म्हणून काय
धोक्याचे तिच्या पोटातले पाय
आवडले लै भारी. :)
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा
बाबड्याला लागतो खुराक थोडा
लगाम न लागे, कधी न ओढा
उधळे तेव्हा, कधी न झोडा
खूपच छान... एकदम छानच.
- प्राजु