जे न देखे रवी...

तरच मग कविता कर...

Primary tabs

जपून वापर जरा शब्द
करू नकोस उधळमाधळ
उडून जातील कस्पटासमान
घोंगावेल टीकेचे वादळ

मनातल्या प्रतिमांना
ओत साच्यात जरा जपून
झिजत चाललेत कंगोरे
तीच तीच कविता करून

निसर्गाची हाक तशी
अधूनमधून कानी येते
सतत बोलावणे आले तर
औषध घेणे भाग पडते

तसे तुझे होऊ नये
म्हणून सांगतो दम धर
फारच दाटून आले असेल
तरच मग कविता कर

अत्त्यावश्यक सूचना -
१. फारच दाटून आल्याने हे विनोदी शीघ्रकाव्य केले आहे. तेंव्हा ह.घ्या.
२. कविता विनोदी आहे हे सांगितले आहेच. तेंव्हा जमेल तेवढे हसावे ही विनंती.
३. माझ्या यापुढील कवितांना याच कवितेतील ओळी फेकून मारू नयेत.:):)

अप्पासाहेब

निसर्गाची हाक अधूनमधून नाय सक्काळी येक डावच येते , पर लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते. आमी मग जडीबुट्टी घितो आनि 'रम' किणगीत खवुन ठिवल्याली असतीया नव्ह का?

लिखाळ

हा हा हा .. निसर्गाच्या हाकेशी तुलना तर लैच भारी :)
मस्त कविता .. मजा आली :)
-- लिखाळ.

श्रावण मोडक

वाचने ३१३ (त्यात माझे एक असावे). पहिले चार प्रतिसाद कोणाचे? अप्पासाहेब, प्रकाश घाटपांडे, लिखाळ आणि विनायक प्रभू. पाचवा माझा. यापैकी पहिल्या चारांनी कधी कविता केल्याचे दिसत नाही. मीही केलेली नाही.
काय म्हणायचे विसूनाना? तुमच्या या संदेशाला इथल्या त्या कॅटगरीतील कविजनांनी 'तिथे' मारले की काय? तसे झाले असेल तर संदेश योग्य त्या व्यक्तींना पोचला आणि म्हणून तो योग्य आहे असे आपण म्हणूया का?

श्रावण मोडक

पटले. आता तुम्हाला दंडवत.
तरीच तुमचे लेखन वाचताना अनेकदा दुर्बोध, दुर्बोध असे मन म्हणायचे आणि मध्येच म्हणायचे की अरे हे दुर्बोध नाहीये, हे तर सुबोध. हे खरे नवकाव्य!!! आत्ता कळले देवा. ;)

विसुनाना

घाटपांडे साहेबांनी ही अडगळीत पडलेली कविता शोधून काढून आज दीड वर्षाने पुन्हा वर आणलेली दिसते.
जसे हर कुत्ते के दिन होते है तसे हर कवितेकेभी दिन होते है असे वाटते. ;)

चला, तेवढेच प्रतिसाद गाठीला. :):)

श्रावण मोडक

हे लक्षातच नाही आलं. कारण तारखा न बघताच कविता वाचण्याची सवय. ती नडली.
(आता तुम्ही कविताही अशाच वाचता असे म्हणून कवी नडणार)!!!

मनीषा

तुम्ही या कवितेला "विनोदी शिघ्रकाव्य" जरी म्हणलं असलं तरी मला ते विनोदी नाही वाटलं... तर एखाद्या अनुभवी व्यक्तीने नवशिक्यांना केलेले मार्गदर्शन वाटले
कविता आवडलीच

झिजत चाललेत कंगोरे
तीच तीच कविता करून ......... हे अगदी पटलं