जनातलं, मनातलं

शुभेच्छा...!

Primary tabs

मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...!

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेमामध्ये चिंब नहावे
जीवन हेच प्रेम असावे
प्रेमासाठीच जगत रहावे...

- प्राजु

राजे (not verified)

मिसळपाव वासी मित्रांना / मैत्रिणींना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा !!!!

प्रेम व्यक्त करा प्रेमाने !!!!!!!!!!!!!

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विसोबा खेचर

धन्यवाद प्राजू, तुला आणि भावजींना माझ्याही अनेक शुभेच्छा... :)

सर्व मिसळपाव परिवाराला माझ्या तर्फेही प्रेमदिनाच्या शुभेच्छा...!

सर्वांवर संत व्हॅलेन्टाईन्ची कृपा असू दे, हीच मनोकामना...!

आपला,
संत तात्याबा.

अवांतर -

सध्या जरा गडबडीत आहोत, परंतु लवकरच आम्ही अनुष्काचं एखादं भेटकार्ड बनवून इथे डकवू.. :)

जमल्यास आज आम्ही व्हॅलेन्टाईन दिनानिमित्त ती मुंबईत असेल तर तिची अवश्य भेट घेऊ! :)

आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या.

कोलबेर

आमच्या गावातल्या प्राणी संग्रहालयातील जंगलच्या राजानं देखिल आपल्या राणी सोबत गुलाबी थंडीत व्हॅलेंटाईन साजरा केला त्याची ही एक छबी :)

विसोबा खेचर

वा वा! सिंहांचा व्हॅलेन्टाईन दिन आवडला.. :)

अवांतर -

वरूणदेवा, व्हॅलेन्टाईनदिनाच्या निमित्तानं घरी परतलास याचं मनापासून बरं वाटलं! :)

आपला,
(विकास, वरूण, आणि प्रियालीवर लोभ असणारा!) तात्या.

सर्किट (not verified)

अरे ती सिंहीण इतकी खूश दिसतेय.. च्यामारी तो सिंह आमचा ऍडव्हायजर व्हायला हवा..

आज व्ह्यालेंटाईनच्या दिवशी असेच प्रयोग करावे म्हणतो ;-)

पण नकोच.. सिंहीण चावते म्हणतात..

- सर्किट

सहज

>मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...!

>सर्वांवर संत व्हॅलेन्टाईन्ची कृपा असू दे, हीच मनोकामना...!

ऋषिकेश

सर्व मिसळप्रेमी संत व्हॅलेंटाईनच्या कृपेने आज क्युपीडच्या बाणाचे निशाण असोत ही सदिच्छा :)

-ऋषिकेश

चतुरंग

प्रेमाचा असा बहर यावा,
की दुसरं काही दिसूच नये,
इतकं तुझं होऊन जावं,
की आपलंआपण असूच नये!

आपलं आपण जेव्हा नसतं,
तेव्हा ते किती छान असतं
काळजी घेणारं कोणीतरी
अगदी आपल्याच आत असतं!

चतुरंग

विसोबा खेचर

रंगराव,

आपल्याला किंवा इतर कुणाला दोष द्यायचा अथवा नांवे ठेवायचा हेतू नक्कीच नाही, परंतु हल्ली मिपावर या चारोळ्यांनी अगदी वात आणलाय बघा! :)

असो, आम्ही आपलं आमचं प्रांजळ मत दिलं. बाकी तुमच्या चारोळ्या चालू द्या, आमचं काय पण म्हणणं नाय! :)

तात्या.

चतुरंग

आपलं म्हणणं खरं आहे, तशा मी कधी चारोळ्या 'फेकत' नाही पण अहो वातात जसा माणूस बडबडतो ना तशी त्या चारोळ्या वाचून वातातच मलाही ही चारोळी झाली!:))
पण आता आम्ही लगेच इलाज करतोय, काही काळजी करु नका!

चतुरंग

सर्किट (not verified)

च्यामारी ह्यांना चारोळ्या म्हणावं की मिपावर लोकप्रिय होण्यासाठी सदस्यांनी ठोकलेल्या चार आरोळ्या, हेच कळेनासे झालेय..

- सर्किट पाचोळा (पाचोळ्यांचा समर्थक)

>>आपल्याला किंवा इतर कुणाला दोष द्यायचा अथवा नांवे ठेवायचा हेतू नक्कीच नाही, परंतु हल्ली मिपावर या चारोळ्यांनी अगदी वात आणलाय बघा! :)

तात्या,
तुमचं हे स्वगत स्पष्ट लिहिणे आम्हाला बिलकूल आवडत नाही. ;)
अहो, चारोळ्या वाचून वाचून आम्ही सुद्धा चारोळ्याची भाषा बोलतोय.

उदाहरणार्थ आमचा सकाळचा संवाद आपल्यासाठी आणि मिपाच्या वाचकांसाठी सादर ...............:)!!!!

'पोहे' होणार असतील तर
तर 'चहा' घेण्याला अर्थ आहे,
आग्रह कोणी करणार नसेल तर
वाट पाहणे सुद्धा व्यर्थ आहे.

विसु :- चारोळ्या करणा-या आमच्या मिपाच्या मित्र मैत्रीणींची आम्ही थट्टा/ उपहास/ टिंगल करतोय असा कृपया अर्थ घेऊ नये ही नम्र विनंती. ( ह. घ्यावे )

चतुरंग

आपली ही 'चहा-पोहे' आरोळी (चुकलो) चारोळी बाकी फर्मास हां!
बाकी सगळ्या चारोळ्या-पाचोळ्या गेल्या तेल लावत!

चतुरंग

सर्किट (not verified)

काय जबरा चारोळी केलीत प्राडॉ !

वा !

आता त्याचे व्हॅलेंटाईन डे रुपांतर, सौ. प्राडाँच्या भाषेतः

उपमा शिजतोय तोवर
चहा घेण्यात अर्थ आहे
प्राडॉंनी दात घासेपर्यंत
चुंबन घेणे व्यर्थ आहे

घासा घासा लवकर दात घासा !

- (चार आरोळ्यांचा कवी) सर्किट

धनंजय

पुष्पबाणास पुष्कळ यश येवो, आणि सगळे अनंगरंगी रंगून जावो.

(खापरपणजोबांची "अनंगरंगा"ची पोथी हल्लीच सापडलेला) धनंजय

सर्किट (not verified)

तुमच्या पणजोबांचा जन्म नोव्हेंबरात ??

सर्किट

इनोबा म्हणे

सर्व ग्रामस्थांना प्रेमदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! असेच प्रेम करत रहा...

(प्रेमळ) -इनोबा

सर्व मित्र आणि मैत्रिणींना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा !

राजमुद्रा

सर्व मिसळप्रेमीना व मि. पा. वरील पाहुण्याना व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा !

राजमुद्रा

मनीष पाठक

सर्व मि. पा. परीवाराला प्रेमदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! असेच प्रेम करत रहा...

मनीष पाठक

वरदा

मिसळपावच्या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.....!
बाकी तात्या ती अनुष्का छान दिसतेय.....

धमाल मुलगा

व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.....!

मजा करा...

हे हे..तात्या, हल्ली सारख॑ बघून बघून मला पण अनुष्का आवडायला लागलिये!!!!

केशवराव

सर्व मिपा सदस्यांना आणि पाहूण्यांना व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेछ्या .
संत व्हॅलेंटाईनबाबा कि जय !

--------- व्हेलेंटाईनबाबाचा भक्त केशवराव.