जे न देखे रवी...
पथ्य
Primary tabs
आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची सुरेख कविता नेपथ्य
का शेवटी माकड पिणार्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !
चालता लुडकतो इकडे तिकडे पडतो
हे असेच नेहमी बेवड्यांचे होते
लागली वळाया नजर सारखी माझी
हे लक्षण रे थोडी चढल्याचे होते
तू चषक कशाला दिलास हातामध्ये ?
मज दिसू लागले चित्र उद्याचे होते
सोडता सुटेना मदिरा माझ्याच्याने
मज खरे प्रलोभन मदिराक्ष्यांचे होते
जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई
जे काय फरक ते त्या पथ्याचे होते
जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई
जे काय फरक ते त्या पथ्याचे होते
मस्त!!!!
कधीकधी मी मूळ कविता न वाचता तुमच्या विडंबनांचा आस्वाद घेतो, पण या बाबतीत मुळातली कविता वाचून विडंबन खूपच अधिक आवडले!
अजुन मुळ कविता वाचली नाहि आहे. पण ही रचना आवडली :).. आता मुळ कविता वाचतो :)
-ऋषिकेश
आपल्या विडंबनांचा पुस्तकरुपी संग्रह काढण्याचे जरा सिरियसली घ्यावे!
कारणे सुमारशेठ जाणतातच!!??
(असहमत)बेसनलाडू
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई
जे काय फरक ते त्या पथ्याचे होते
खूप आवडल्या ह्या ओळी...मस्त विडंबन..
केशवसुमार = केशवोत्तमकुमार
जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?
क्या बात है...!
तात्या.
--
मी जेव्हा दारुच्या दुष्परिणामाबद्दल वाचलं तेव्हा मी वाचणं सोडून दिलं! :)
फारच छान!
दारुचे दुष्परिणाम ह्यावरची एक ग्राफिती - "दारूने माणूस हळूहळू मरतो - असू दे, इथे घाई कोणाला आहे?"
चतुरंग
जर ताड, माड अन् मोह असे देशीही
मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ?
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई
जे काय फरक ते त्या पथ्याचे होते
वा वा .. मस्त ! मजा आली..
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.