जनातलं, मनातलं

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

Primary tabs

"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो.
मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्‍हाणे घालण्यात येणार आहे.
या संबंधीचे हे जाहिर निमंत्रण मला विरोपाद्वारे मिळाले,मिपाच्या गावकर्‍यांकरिता इथे देत आहे.

आपला मिपाकरी मराठीप्रेमी
इनोबा उर्फ विनायक अनिवसे

विसोबा खेचर

मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा!

तात्या.

"हे बहिणाबाईच्या बहिणाबाई
मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे
गाणे ऐकवशील का ?
या रांडव मराठी भाषेला
पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!!
-नामदेव ढसाळ

जैसे हरळांमाजी रत्नकिळा ।
कि रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा ।
भाषा मराठी ।।

जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी ।
परिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी ।
भाषा मराठी ।।

पखियांमध्ये मयोरु ।
रुखियांमध्ये कल्पतरु ।
भाषांमध्ये मान थोरु ।
मराठीयेसी ।।

तारांमध्ये बारा राशी ।
सप्तवारांमध्ये रवि-शशि ।
या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी ।
बोली मराठीया ।।

- फादर स्टिफन्स