Skip to main content

भूछत्री

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 21/09/2014 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू...

मलई!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 05/09/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे.

ताई दीर तुझा गं वेडा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/08/2014 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते. असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत. तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 05/05/2014 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच सुरसुरी मग .. प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते ! खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते माझेच पैसे माझ्या खिशातून जाते ! संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते ती अशीच येथे घाईत फार येते पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा ओ.टी.

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 20/04/2014 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

<पहिली धार>

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 03/04/2014 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
सोडा नसला तरी चालेल , पण संध्याकाळी एक चपटी असावी ! एकही चुनाडबी नसली तर चालेल , पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी ! लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही , पण चखण्यात एक चकली तरी असावी ! हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली , पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी ! क्रेट संपवायला गँग आहेच , पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच ! पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण , पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!! -पिणार ____________________________________________

देव पाहिलेला माणूस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/03/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 01/01/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंग
काव्यरस

फुकुशिमानो तोत्तोचान

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 15/12/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं तसं उमटतं तिच्या गोबर्या गालावर हसू फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही काय होणार पुढे तिला विचार करवत नाही गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही ओजिइसान
काव्यरस