सुख
हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!
तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
कळाले सापडल्यानंतर!
भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
कळाले सापडल्यानंतर!
शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
कळाले सापडल्यानंतर!
- संदीप चांदणे
काव्यरस
मिसळपाव
संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.
माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?
दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?
हिशोब मी हि कशास बांधू?
Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य