जुनी पत्रं
आज उघडुन बसले होते
सगळी जुनी पत्रे
तुझी, माझी, काही जपलेली,
न पाठवलेली, काही फाडलेली....
कधी डोळे भरुन येत होते
कधी रागाने लाल होत होते..
कधी मी उदास होत होते
कधी हरवून जात होते...
एक पत्र तुझं मला पाठवलेलं
एक असच खुप जुन्या मैत्रिणीचं
पहिल्यांदा माहेरी गेल्य नंतर
एकटं वाटत असताना तू लिहिलेलं
तसचं तुझ्या सोबत आल्यानंतर
सखी ने पा्ठवलेले खास बंध....
असच एक पत्र हाती आलं
खुप खोल दडवून ठेवलेलं..
माझ्या बाबांच......
लग्नानंतर आलेल पहिलं पत्र...
खुपसं काळजी करणारं
तेवढचं धीर देणारं..
खुप न सांगता खुप काही सांगणारं....
जपुन ठेवलय मी आज ही
आज तेच पत्रं म्हणजे
माझे बाबा झालेय
मला सोडून गेलेले पण
काव्यरस
मिसळपाव