Skip to main content

धर्म

मोहरम : माहिती हवी आहे

लेखक दत्ता जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले. या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.

थिऑसॉफी, आणि थिऑसॉफिकल सोसायटी बद्दल माहिती हवी

लेखक माहितगार यांनी बुधवार, 07/10/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझी जिज्ञासा : १) थिऑसॉफी म्हणजे काय ? २) थिऑसॉफिकल सोसायटीचे उद्दीष्ट कार्य योगदान काय ? थिऑसॉफी आणि थिऑसॉफिकल सोसायटीची बलस्थाने कोणती ? ३) थिऑसॉफिकल सोसायटीची कोणकोणती विभाजने आणि का झाली ? ४) थिऑसॉफीवरील आक्षेप आणि थिऑसॉफीच्या मर्यादा कोणकोणत्या ? ५) थिऑसॉफी, थिऑसॉफिकल सोसायटी कडे बघण्याचा तत्कालीन हिंदू तत्त्ववेत्त्यांचा दृष्टीकोण कसा होता ?

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 13/09/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत.