बेस्ट दिन विशेष - मुंबईतील बेस्ट सेवेचा इतिहास (स्थापना ते 1947)- भाग 1
मुंबईतील ट्रॅम सेवा
तारीख होती नऊ मे 1874. मुंबई शहरातले बरेच नागरिक ठेवलेले कपडे घालून रस्त्यावर उभे होते. टन टन आवाज करत जाणारी घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रॅम चा मुंबईच शुभारंभ होत होता. कुलाबापासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत आणि बोरीबंदर पासून पायधूनी मार्गे काळबादेवी असे टदोन ट्रामचे फाटे त्या दिवशी सुरू झाले. आणि मुंबईत सार्वजनिक परिवहन वाहतुकीची सुरुवात बॉम्बे ट्रॅमवे कंपनी ह्या कंपनीद्वारे झाली.सुरुवातीला सामान्य मुंबईकरांना ट्रॅम मधून प्रवास करण्यास खूप भीती वाटे. पण मग हळूहळू ट्रॅम ला मुंबई करांची पसंती मिळू लागली.
मिसळपाव