Skip to main content

इतिहास आणि संस्कृती

बाल'भारती की 'बैल'भारती?

लेखक स्वधर्म यांनी शनिवार, 22/08/2026 22:14 या दिवशी प्रकाशित केले.

नुकतेच बालभारतीने इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल केले आहेत. त्यात खालील माहिती आहे:

- वेदकाळात आपले पूर्वज शाकाहार करत होते.

- वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता.

- आपल्याकडे उच्च दर्जाचे गणिताचे ज्ञान होते - वैदिक गणित.

- इतर अनेक पूर्वगौरव असणारा मजकूर आहे.

त्याबाबत मुंबई तक ने घेतलेली संस्कृत व इतिहास तज्ञांची मुलाखत : 

https://youtu.be/v1c-BKohgOE?is=-RjJD0N5fM6CxeEx

तुर्कस्थानातील अलेवी समुदाय आणि तुर्कस्थानचे बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण

लेखक माहितगार यांनी रविवार, 09/08/2026 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

अलेवी समुदाय आणि त्यांच्या परंपरा (परिचय)


अलेवी हा तुर्कस्थानातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याक समुदाय आहे, जो एकूण लोकसंख्येच्या साधारणपणे १०% ते १५% आहे. अलेवी पंथ हा इस्लामच्या सुफी आणि शिया विचारसरणीचा एक अनोखा मिलाफ आहे. ते प्रेषित मोहम्मद, त्यांचे जावई हजरत अली आणि त्यांच्या वंशजांना (१२ इमाम) अत्यंत पवित्र मानतात. मात्र, त्यांची जीवनपद्धती आणि धार्मिक आचरण पारंपरिक सुन्नी इस्लामपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

ऑशविट्झमधली वीरांगना- माला झिमेटबाऊम

लेखक मार्गी यांनी बुधवार, 17/06/2026 22:01 या दिवशी प्रकाशित केले.

✪ ऑशविट्झ छळछावणी- इतिहासातील कलंक 

✪ नरकामध्येही मालाने जपलेली माणुसकी आणि जिद्द 

✪ ऑशविट्झमधून सफल पलायन पण... 

✪ वाचू शकला असता पण मालासोबत पकडला गेलेला तिचा मित्र 

✪ स्वत:च्या रक्तरंजित हाताने गार्डला थप्पड 

✪ काळरात्रीला उजळून टाकणारी तेजशलाका 

पॅरिसमधील मिपाकर आणि अपरिचित पॅरिसबद्दल आगामी लेखमाला.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 29/05/2026 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मित्रहो.

नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो  असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा. 

पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी,  ग्रंथालये अशा अनेक  रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र  विखुरलेल्या आहेत. 

मकरसंक्रांत एक जागतिक परंपरा?

लेखक निनाद यांनी सोमवार, 15/01/2024 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
मकरसंक्रांत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण केल्यानंतर साजरा केला जातो. मकरसंक्रांत नंतर दिवस लांब होतात आणि रात्री कमी होतात. हा सण नवीन सुरुवात आणि शुभतेचे प्रतीक आहे. मकरसंक्रांतीच्या काही खास परंपरांमध्ये काही जागतिक संदर्भ दिसतात का हे आपण पाहू या. मकरसंक्रांत हा सण भारतात सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांसह साजरा केला जातो. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो, तर पंजाबात हा सण लोहरी म्हणून ओळखला जातो.

स्विकारावं का हे?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 08/06/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
Vadpujan सदर फोटो फेबुच्या कृपेने मिळाला आहे.फोटो पाहिल्यावर आधी लक्ष जातं ते टी शर्ट आणि शॉर्टस् घालून वडाची पुजा करणार्‍या या स्त्री कडे! कदाचित ती कोणासोबत मदतीसाठीही आलेली असू शकते;पण समजा ती याच पोषाखात पुजेसाठी आली असेल तर? आपण असे बदल स्विकारावेत का?

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/11/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे.

टिपू सुलतान - इतिहास

लेखक sagarpdy यांनी बुधवार, 11/11/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
कालच कर्नाटकात टिपू सुलतान जयंती वादातून वरून दुर्दैवी घटना झाली. त्यात गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेवर तसेच कर्नाडांच्या वक्तव्यावर विविध राजकीय भाष्ये येत आहेत व पुढील काही दिवस येतीलच. या घटनेमुळे व कर्नाडांच्या वक्तव्यांमुळे काही प्रश्न पडले : १. टिपू सुलतानाचा इतिहास काय ? मुख्य राजकीय व सामाजिक कर्तबगारी काय ? (सिरियल फार लहानपणी पहिली, आठवत नाही. शालेय अभ्यासक्रमात तितकासा उल्लेख नाही). शक्य असल्यास संदर्भ कळवणे. २.

डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे नवे पुस्तक प्राचीन भारत, इतिहास आणि संस्कृती

लेखक कोकणप्रेमी यांनी शनिवार, 10/10/2015 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
अपरांतचे नवीन पुस्तक “प्राचीन भारत इतिहास व संस्कृती“ ज्येष्ठ इतिहास संशोधक व डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी लिहीलेल्या “प्राचीन भारत इतिहास व संस्कृती“ या पुस्तकातुन वाचकांना पहिल्यांदाच मराठीतुन आपल्या गौरवशाली इतिहास व संस्कृतीची अद्ययावत माहिती मिळते. या पुस्तकांत डॉ. देगलूरकर यांनी पाषाणयुगापासून १३व्या शतकापर्यंतच्या काळावर विस्ताराने माहिती दिली आहे. प्राचीन इतिहास, इंडॉलॉजी या विषयाच्या अभ्यासकांना हे पुस्तक विशेष उपयुक्त ठरणार आहे. हे पुस्तक ४५६पानी असुन भरगच्च माहितीसोबतच अनेक छायाचित्रेही असल्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे.