Skip to main content

जीवनमान अनुभव

खाणं...चरणं...हादडणं...

लेखक मन यांनी रविवार, 20/09/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा डोक्यात खाण्याबद्दल जे काही येतय ते लिहून काढावं म्हणतोय. . . "तुझा आहार चांगलाय हां" अशी कमेंट/तारिफ(की टॉण्ट/टोमणा?) अजून एकदा ऐकायला मिळाला. कुणासोबत पंगतीला/बुफेला वगैरे बसणं झालं की अधूनमधून अशा कमेंटा मिळतातच. तरी मागील आठेक वर्षे बी एम आय बावीसेकच्या घरात आहे. वेगळा असा व्यायाम/पोहणं/जॉगिंग असंही काही करणं जमत नाही. जवळजवळ पूर्ण बंद. दिसायला जरी असं दिसत असलं की एकूणात मी बरच हादडतोय; तरी माझे खाण्याचे तसे बर्रेच नखरे आहेत. पण एकूणात काहीतरी बरोबर(किंवा निदान ठीकठाक) सुरु असणार. म्हटलं आठवून पहावं. . . मला ताजं,ओलं नारळ आवडतं.

१० अमेझिंग वेट लॉस टिप्स

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 16/09/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार या काही ट्राईड अँड टेस्टेड वेट लॉस टिप्स आहेत ज्या फार प्रभावी आहेत. वेल; माफ करा. इथे 'वेट लॉस' बद्दल काहीही नाही. पण एका 'ग्रेट लॉस' बद्दल आहे जो आपण आज ना उद्या अनुभवणार आहोत. पावसाचा लॉस; पाण्याचा लॉस, पर्यावरणाचा लॉस. 'वेट लॉस' हे शब्द वाचून ज्या तत्परतेने लोकं पुढचा मजकूर वाचतील त्या तत्परतेने इतर कुठलंही शीर्षक वाचून वाचणार नाहीत, म्हणून ही चखलाशी केली. ही बाब आपल्या प्राधान्यक्रमाविषयी बरंच काही सांगते, पण असो; इथे तो मुद्दा नाही. पाऊस गेल्यावर्षी आणि या वर्षीही वाईट झालाय. पुढेही फार होईल अशी चिन्हं नाहीत. राज्यात, देशात अनेक भागांत दुष्काळ पडलाय. शेतकरी हतबल आहे.

अनुभव - विवियाना - राजधानी - पोट बिघडणे

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 11/07/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक ५ जुलै रोजी आमच्या घरातील दोन जण आणि त्यांचे इतर ६ मित्र मैत्रिणी ठाणे येथील विवियाना मॉल मधल्या राजधानी या प्रसिद्ध भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथले जेवण आवडण्यासारखे नव्हते, सर्व्हिस तत्पर नव्हती या गोष्टी होत्याच. दुस-या दिवशी सकाळपासून आमच्यापैकी ४ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. हा त्रास इतका झाला की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याची वेळ आली. त्या दिवशी संध्याकाळपासून बाकी ४ जणांनाही असाच त्रास झाला व औषध आणण्यापर्यंत वेळ आली.

याला जबाबदार कोण?

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 24/06/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
एक अपघात....न केलेला मधील उल्लेखिलेल्या अपघातग्रस्त गृहस्थांचे बेशुद्धावस्थेतच निधन झाल्याचे कळले.या गृहस्थाना तिथेच रक्तस्राव होत असलेल्या स्थितीत ठेऊन जमाव मारामारी करत होता, त्यात मोलाचा वेळ वाया गेला. साधारण पाऊण तासाने पाली आरोग्य केंद्रात पोचल्यावर जखमीवर उपचार करण्याआधी तिथेही रुग्णवाहिका का आली नाही यावरून आधी डॉक्टरला मारहाण करण्यात आली. त्यातही वेळ वाया गेला.तिथे पाणी नसल्याने आणि इतर सोयीसुविधा नसल्याने जुजबी उपचार करून जखमीला अलिबाग सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.अलिबागहूनही थोडे उपचार करून जखमीला वाशी येथे एम.जी.