Skip to main content

काथ्याकूट;ताज्या घडामोडी

गाथा भारतीय रेडिओची - 100 वर्षपूर्ती विशेष 📻

लेखक साहित्ययात्री यांनी गुरुवार, 23/07/2026 19:21 या दिवशी प्रकाशित केले.

 

" नमस्कार, हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे सात वाजले आहेत. आपण ऐकत आहोत प्रादेशिक बातम्या " 
हा आवाज गेले कित्येक वर्षे तमाम भारतीयांच्या कानात भरून राहिला आहे. 
विविध भाषांमध्ये बोलीभाषांमध्ये प्रसारित केलेल्या बातम्या, विविध संगीताचे कार्यक्रम, ध्वनिमुद्रित केलेली नाटके, चित्रपटगीते ह्यांनी असंख्य भारतीय लोकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय चक्रीवादळे, 2004 साली आलेली भयंकर सुनामी अश्या संकटाच्या वेळी लाखो  भारतीयांपर्यंत वेळेवर संदेश पोचवला आहे. अश्या त्या आकाशवाणी चा आज 100वा वाढदिवस!

५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 31/05/2026 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारत जसजसा आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत आहे, तसतसा प्रस्थापित महाशक्तींना हे सहन होणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आता थेट युद्धाऐवजी 'फिफ्थ जनरेशन वॉरफेअर' (5GW), म्हणजेच डिजिटल, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक युद्धाचा वापर सुरू झाला आहे. हे युद्ध रणभूमीवर नाही, तर मानवी मनाच्या स्क्रीनवर लढले जाते.

पाभे की बात क्र. ९

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 30/05/2026 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,

पाभे की बात १

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत.