mobile security
नवीन फसवणुकीचा प्रकार
सर्व नावे बदलली आहेत. दोन्ही प्रसंग खरे आहेत
------
प्रसंग १
राजेश ला एका दुपारी अचानक WhatsApp विडिओ कॉल येतो. नंबर त्याच्या मोबाईल मध्ये सेव नसतो तरी तो फोन घेतो. पलीकडून एका मुलीचा आवाज पण काळी स्क्रीन. काही दिसत नाही. राजेश तिला ओळखत नाही पण ती त्याला म्हणते ओळख. एवढ्या लवकर विसरलास ना. २ ते ३ मिनिटे असेच होते आणि शेवटी ती wrong नंबर सांगून फोन कट करते.
१० मिनिटांनी एक मेसेज येतो. राजेश मोबाईल उघडतो आणि जागीच खिळून बसतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे.
मनी वॉलेट आणि add money to wallet
Mobiqwik, paytm वगैरे वॉलेट सेफ आहेत का?
------
मोबाइल/डिटीएच वगैरे रिचार्ज त्यांच्या app मधून करायला गेल्यास नेट बँकिंग पर्याय निवडल्यास ते फक्त आपल्याला हव्या असलेल्या बँकेची साइटला डिरेक्ट करतात. आपला नेट बँकेशी जोडलेला फोन नंबर विचारत नाहीत. ही चांगली गोष्ट आहे. पुढे साइटवरून आपण लॉगिन करून पेमेंट confirm करतो.
---------
Mobiqwik, paytm वगैरे वॉलेट मध्ये मात्र Add Money करायला गेल्यास मात्र ते नेटबँकिंग साईटला रिडिरेक्ट न करता आपला कनेक्टेड फोन नंबर द्या म्हणतात. तो मिळवून वॉलेट app वाले काम करणार. असे का?
मिसळपाव