Skip to main content

नागरी सुविधा

एक मृत्यू प्रमाणपत्र, 'बारनिशी' आणि पुणेरी अनुभूती!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/08/2026 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

 

जन्म असो वा मृत्यू प्रमाणपत्र, काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या मूळ प्रतीच दाखल कराव्या लागतात. अर्ज दाखल करून सहसा त्या मिळतात देखील. वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रती संपत आल्यामुळे मी आधी जवळचे पालिका प्रभाग (क्षेत्रीय/वॉर्ड) कार्यालय गाठले; कारण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जवळच्याच प्रभाग कार्यालयातून सहज मिळाले होते. प्रभागातील कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम तेव्हाही पुणे शहराच्या सेंट्रलाईज्ड डेटाबेसशी संलग्न असावी असे वाटते. 

बेजबाबदार कोण अधिकारी की कंत्राटदार ?

लेखक नितीनचंद्र यांनी मंगळवार, 19/04/2016 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5028796491016038209&Se... ही दैनीक सकाळ मधली आजची बातमी पहा. याबातमीचा रोख असा आहे की कंत्राटदाराच्या बेपर्वा वागण्याने भर उन्हाळ्यात पिंपरी चिंचवड करांच्या तोंडचे पाणी पळाले. कंत्राटदार नदीवर पुल बांधताना भराव घालतो कारण त्या शिवाय पिलर्स उभे करणे शक्य नसते. म्हणजे संबधीत खाते असा बांध घालायची परवानगी देते हे ही उघड आहे. अश्या बंधार्‍या खालुन पाणी वाहुन जाणे अपेक्षीत असते.