भीतीच्या भिंती: ९. हल्ला
भाग ८
(निवेदन: काही तांत्रिक अडचणींमुळे ही लेखमाला सध्या अपूर्ण ठेवावी लागत आहे. वाचकांनी त्याबद्दल मला क्षमा करावी. यथावकाश लेखन पूर्ण करेन इतकंच आत्ता म्हणेन.)
गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – ‘निवडणूक आयोग’. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे.
मिसळपाव