Skip to main content

अनुभव

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 23/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ५ : हेमकुंड साहिब

लेखक आकाश खोत यांनी शुक्रवार, 22/01/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ आदल्या दिवशी वॅलीमध्ये पोहचायला आम्हाला उशीर झाला. मग उशिरामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप कमी वेळ वॅलीचा आनंद लुटता आला. आज वॅलीसाठी ठेवलेला दुसरा (जादा) आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे आम्ही आज काहीही करून लवकर पोहचुन जास्तीत जास्त वेळ वॅलीमध्ये काढण्याचं ठरवलं होतं. पण निसर्गाच्या मनात तसं काही नव्हतं. मी आणि अरूप आधी तयार झालो. बाकीच्यांना अजून वेळ लागेल आणि पुन्हा उशीर होईल असं वाटत होतं.

माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 18/01/2016 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भटकयात्रा दिनांक - ३० डिसेंबर २०१५ गाव - ठेंगोडे ठिकाण - जागृत सिद्धिविनायक मंदिर व इतर छोटी मंदिरे कसे जायचे ? महाराष्ट्रातले नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहर अनेकांना माहीत असेलच. मालेगाव च्या जुन्या बस स्थानकावर गेल्यास तेथून सटाणा जाणारी बस पकडावी. सटाणा या गावाचे दुसरे नाव बागळण असेही आहे. मालेगाव सटाणा ३३ किलोमीटर आहे. सटाणा येथे उतरून नासिक किंवा देवळा बस पकडावी. त्या बसला या मंदिराचा थांबा आहे. बसेस कमी आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत चालत जाऊन तेथून काळी पिळी रिक्षा पकडावी. तेथून मंदिर ७ किलोमीटर आहे.

माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 18/01/2016 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती दिनांक - ३० डिसेंबर २०१५ गाव - ठेंगोडे ठिकाण - जागृत सिद्धिविनायक मंदिर व इतर छोटी मंदिरे कसे जायचे ? महाराष्ट्रातले नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहर अनेकांना माहीत असेलच. मालेगाव च्या जुन्या बस स्थानकावर गेल्यास तेथून सटाणा जाणारी बस पकडावी. सटाणा या गावाचे दुसरे नाव बागळण असेही आहे. मालेगाव सटाणा ३३ किलोमीटर आहे. सटाणा येथे उतरून नासिक किंवा देवळा बस पकडावी. त्या बसला या मंदिराचा थांबा आहे. बसेस कमी आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत चालत जाऊन तेथून काळी पिळी रिक्षा पकडावी. तेथून मंदिर ७ किलोमीटर आहे.

आरक्षणाची गरज

लेखक अन्नू यांनी शनिवार, 16/01/2016 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?

साहित्यिक कसले हे !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 16/01/2016 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

हेलो हेलो

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 14/01/2016 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘हेलो हेलो’ ‘कोण ?’ ‘उपाध्ये बोलते.’ ‘बोला’ ‘अमिको ची नवीन औषधे आलीयेत. एक महिन्यात चार केजी वेटलॉस.’ ‘अहो मला वजन कमी नाही करायचं, वाढवायचं आहे.’ ‘मग वेटगेनचं औषध घेऊन संध्याकाळी येऊ ?’ ‘नको, माझी डायेटीशियन आहे, ती खंबीर आहे माझी काळजी घ्यायला.’ ‘ताई, प्रोटीन टी आहे बघा अमिकोचा. वजन हमखास वाढणार. एक महिन्याची पावडर बाराशे रुपये फक्त. आणू ?’ ‘अहो नको उपाध्येवहिनी. मी कॉफी घेते फक्त.’ ‘मुलांना द्या. चांगली आहे हो.’ ‘मुलगा कॉम्प्लान घेतो.’ ‘कसलं पांचट ते कॉम्प्लान ! अमिको जेकप्रोट एकदा देऊन बघा, परत दुसरं काही पिणार नाही.’ ‘सॉरी उपाध्येवहिनी.

बँकेचा असाही एक अनुभव...

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 12/01/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना सुलभ व्हावे या दृष्टीने अनेक सुविधा अलिकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सारख्या सुविधांमुले पैशाची देवघेव, खरेदी – विक्री, नियमित सेवांची बिले भरणे इत्यादी व्यवहार अक्षरशः एका बोटावर होत आहेत. ए. टी. एम. च्या सुविधेमुळे तर क्षणार्धात पैसा ग्राहकासमोर हजर होतो. या सुविधांबरोबरच गैरव्यवहाराच्या, सदोष सेवेच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. ए. टी. एम.

संवाद साधन

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/01/2016 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोरीवलीत राहातो. आमच्या भागात एक मराठी माणसाचे बियर शॉप आहे. काल रात्री त्याच्याकडे एकजण आला. 'केम छो काका' अशी आस्थेने मालकाची विचारपूस केली. मालकाने दोन्ही तळवे उंचावून, पांडुरंग, पांडुरंग म्हटले. मी मराठी असल्याने, त्याच्या प्रतिसादाचा अर्थ मला समजला. 'चित्ती असो द्यावे समाधान' असे त्याला म्हणायचे असावे... त्या ग्राहकाला ते काही समजले नसावे! 'त्रण स्ट्रोंग आपो'... तो गोधळल्या आवाजात म्हणाला, आणि काऊंटरवरचा पोरगा गोंधळला. 'गुजराती समझती नही क्या?... सीख लो यार, गुजराती एरियामे रहते हो ना?'...