मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०११ नावनोंदणी
नमस्कार,
२०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.
या मेळाव्यासाठी प्रत्येक सहभागी सदस्याकडून वर्गणी रू १००/- रोख अपेक्षित आहे. ही वर्गणी मेळाव्याच्या दिवशीच आयोजकांकडे जमा करता येईल. मेळाव्याची रूपरेषा, स्थळ व वेळ यांचा समन्व्य साधता यावा म्हणून जास्तीत जास्त ७५ सदस्यांनाच नावनोंदणी करू देण्याचे बंधन आयोजकांवर आहे.
मिसळपाव
२६ मार्च २०११ रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई विभागात जगन्नाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला.