ब्रिटिश वृत्तपत्रांच्या आधारे शिवचरित्रावर प्रकाश टाकण्याचा अनोखा उपक्रम.
काल घरी गेल्यावर चॅनेल सर्फिंग करताना स्टार माझावर अत्यंत महत्वाची बातमी दाखवत होते. त्यात सायली दातार व श्री. मेहेंदळे यानी लंडन मधील जुन्या वृत्तपत्रांच्या अर्काईव्ह मधील शिवाजीमहाराजांच्या काळात प्रकाशीत झालेल्या प्रतींमधून शिवाजीराजांविषयी प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा मागोवा घेण्याच्या उपक्रमाबद्दल माहीती दाखवित होते. हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून त्यामुळे शिवरायांबद्दल त्यावेळच्या इंग्लंडमधील लोकांचे (त्रयस्थ देशातील)काय मत होते ते कळेल. सर्वप्रथम या उपक्रमाबद्दल दोन्ही संशोधकांचे अभिनंदन. यात दोन्ही संशोधकांनी प्रकर्षाने व्यक्त केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे.
१.
मिसळपाव