Skip to main content

भाषांतर

युद्ध....... खलिल जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 30/03/2015 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
राजवाड्यात जंगी मेजवानी चालू होती, तेव्हा एक माणूस तिथे घाईघाईने आला आणि त्याने राजपुत्राला लवून मुजरा केला. सगळे पाहुणे त्याच्याकडे टकामका पाहू लागले कारण त्याचा एक डोळा निखळला होता, रिकाम्या खोबणीतून रक्त ठिबकत होते. राजपुत्राने त्याला विचारले, ‘ही आपत्ती तुझ्यावर कशी काय कोसळली?’ त्यावर तो सांगू लागला, ‘ हे राजपुत्रा, मी व्यवसायाने चोर आहे. आज अमावस्या! आकाशात चंद्र नव्हता म्हणून मी चोरी करण्यासाठी एका दलालाच्या घरात घुसायचे ठरवले. पण अंधारात चूक झाली. दलालाच्या घराऐवजी मी विणकराच्या घरात शिरलो. अंधारात उडी मारताना तिथल्या हातमागाला माझा धक्का लागला आणि माझा डोळा निखळून पडला.

सुंदरी आणि जत्रा ...... खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 25/03/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
एका मोठ्या शहरात जत्रा भरली होती. एक अवखळ सुंदरी शेजारच्या खेड्यातून त्या जत्रेस आली. खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे तिचे हसू होते. गालांवर गुलाबाच्या कळ्यांची लाली विलसत होती. सूर्यास्ताची सोनेरी हुरहूर तिच्या रेशमी, भुरभुरणाऱ्या केसांत रेंगाळत होती. उषेप्रमाणे तिचे मुखमंडल अगदी प्रसन्न होते. सूर्याने पृथ्वीचे चुंबन घेताच, क्षितिजाचे ओठ विलग व्हावेत, त्यातून केशरी हसू निसटावे, तसे तिचे हसरे ओठ!

माणूस ..... खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 22/03/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो. तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते. परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते. तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा. त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले, ‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’ त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे! एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय . पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही.

युद्ध आणि छोटेसे देश...... [ खलील जिब्रान ]

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 20/03/2015 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते. त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला. गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला. त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर! ते पाहून पहिला गरुड खवळला. त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले. त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला. कोकराच्या आईने वर पाहिले.

दर्शन

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 18/03/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
गवताच्या एका पात्याने पिंपळाच्या प्रचंड सावलीकडे तक्रार केली, 'तू सारखी इकडून तिकडे हलत राहतेस, माझी शांतता भंग पावते!' सावलीने उत्तर दिले, 'मी हलत नाही. जरा वर पहा, तिथे एक झाड आहे आणि ते वाऱ्याने चहूबाजूंनी हलते!' गवताच्या पात्याने आपले इवलेसे डोळे वर करून पहिले........ ........ आणि जीवनात पहिल्यांदाच त्याला आपल्यावरील वृक्षाच्या विराट रूपाचे दर्शन घडले! ते पाते मनातल्या मनात म्हणाले, ' माझ्यापेक्षा हे गवत खूप विशाल आहे!' ..... तेव्हापासून ते पाते शांतचित्त झाले. खलील जिब्रानच्या 'The Shadow'या लघुकथेचा भावानुवाद.

थ्री क्वशन्स- लिओ टॉलस्टॉय

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 26/02/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
उद्याच्या जागतिक मराठी दिनानिमित्त लिओ टॉलस्टॉय यांच्या 'थ्री क्वशन्स' कथेचा स्वैर अनुवाद... एकेकाळी एका राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही एक एक घटना आहे. कोणताही अचूक निर्णय घेण्याची निश्चित वेळ कोणती? कोणाचे म्हणणे गांभिर्यपूर्वक ऐकावे आणि कोणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे?

अंधार क्षण भाग ५ - सुरेन मिर्झोयान (लेख २६)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 19/01/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - सुरेन मिर्झोयान ज्यांना दुस-या महायुद्धामध्ये अजिबात रस नाही त्यांनीसुद्धा स्टॅलिनग्राडच्या लढाईबद्दल ऐकलेलं असतं. या लढाईपासून जर्मनीच्या पराभवाची सुरूवात झाली. त्यानंतर कर्स्कच्या लढाईने जर्मनी युद्ध जिंकू शकत नाही हे सिद्ध झालं, त्यामुळे त्याचा फायदा उचलण्यासाठी रशियन सैन्याने ' आॅपरेशन बाग्रेत्सिओन ' ही प्रतिचढाई सुरु केली आणि शेवटी बर्लिनमध्ये जर्मनीने शरणागती पत्करली. हा सगळा घटनाक्रम सुरु करणा-या या लढाईला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकी संहारक, दाहक आणि हातघाईची लढाई याआधी आणि यानंतरही क्वचितच लढली गेली असेल.

अंधार क्षण भाग ५ - व्लादिमीर ओग्रिझ्को (लेख २५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 12/01/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - व्लादिमीर ओग्रिझ्को जर मला आज कोणी विचारलं की १९३९ ते १९४५ हा जो दुस-या महायुद्धाचा संपूर्ण कालखंड आहे त्यातला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक असा दिवस निवड, तर मी सर्वांना माहीत असलेले दिवस - उदाहरणार्थ ३ सप्टेंबर १९३९, जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडवर जर्मनीने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं; किंवा ७ डिसेंबर १९४१, जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर आकस्मिक रीत्या बाँबहल्ला करुन युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं; किंवा २२ जून १९४१, जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर जगातला सर्वात मोठा आक्रमक हल्ला चढवला - निवडणार नाही.

अंधार क्षण भाग ५ - निष्ठा (लेख २४)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 05/01/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ५ - निष्ठा मध्ययुगीन युद्धांमध्ये आणि दुस-या महायुद्धामध्ये असलेला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे धर्म हा मुद्दा दुस-या महायुद्धात अजिबात महत्वाचा नव्हता. नाझींच्या ज्यू द्वेषाचं कारण धार्मिक नसून वांशिक होतं. हिटलरला तर कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती. पण धार्मिक मुद्दे जरी महत्त्वाचे नसले तरी एखाद्या विचारसरणीवर पराकोटीची निष्ठा हे दुस-या महायुद्धाचं वैशिष्ट्य होतं. एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरसारख्या कट्टर नाझींसाठी सोविएत रशियाविरूद्ध पुकारलेलं युद्ध म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद आणि राष्ट्रीय समाजवाद या दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता.

अंधार क्षण भाग ४ - ल्युसिल आयशेनग्रीन (लेख २३)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 29/12/2014 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - ल्युसिल आयशेनग्रीन पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक हिंसाचार हा फक्त नाझीच करत होते असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या लोकांचा गैरफायदा घेणं यावरही फक्त नाझींची मक्तेदारी नव्हती. ल्युसिल आयशेनग्रीनला या दोन्ही गोष्टींचा जो अनुभव आला त्यावरून मी म्हणेन की जे तिला सहन करावं लागलं तशी वेळ फार कमी लोकांवर आली असेल आणि सर्वात भयावह म्हणजे जेव्हा तिला हे सगळं पहावं लागलं तेव्हा ती फारच लहान होती - ती ८ वर्षांची असताना या गोष्टींची सुरूवात झाली आणि जेव्हा त्यांचा अंत झाला तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती.