Skip to main content

भाषांतर

मरण, मृत्यू वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी बुधवार, 02/05/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
युजींसंदर्भात मित्रांशी होणार्‍या बोलण्‍यात नेहमी हा मुद्दा येतो की युजींमध्‍ये युनिक असं काय ? मला जे त्यांच्यातलं युनिक जाणवतं ते म्हणजे किंचीतही गूढ अर्थ मागे न ठेवता सोप्या शब्दांच्या मदतीने प्रश्नाला भिडणे. खूप सुरुवातीच्या काळात युजींचा पवित्रा संवाद सुलभ होता, त्या वेळचा हा संवाद.

भाषांतरीयाचा दृष्टांत

लेखक धन्या यांनी बुधवार, 25/04/2012 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी एक भाषांतरी असे. तो भाषांतर करी. हिंद गीत आणिक आंग्लभाषिक वेचे निवडी. अर्थाचा अनर्थ करण्याचा निर्धारु करी. वाक्यागणिक गहन मरहट्ट प्रतिशब्द ठेवी. मग त्या मुळ लिखिताची काशी होई. ही काशी आणिकी जालस्थळाचा आणिकी जालस्थळा पाडी. कुणी वाचक तयास साद देई. कुणी कावून हेच कर्म करुन पलटवार करण्या प्रवृत्त होई. परी भाषांतरी भाष्यकर्माचा वगळ ना करी. सुत्र : भाषांतरकर्मे आविष्कारु केल्यावीण धनार्जननिवृत्तू प्रसिद्धीस पात्र नव्हे.

पाऊली यांचा वगळ सिद्धांत

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 25/04/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊली यांचा वगळ सिद्धांत (अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल) त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत. फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे.

ऑपरेशन एंटेबी

लेखक अमृत यांनी सोमवार, 23/04/2012 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
२७ जुन १९७६, दुपारी साडेबाराला 'एअर फ्रांसचे' उड्डाण संख्या A १३९ हे एअरबस ३०० विमान ग्रीस मधिल अथेन्स विमानतळाहून पॅरीसला जाण्याकरीता उडाले. इज्राइल मधिल 'तेल अवीव' येथून निघालेल्या या विमानात २४८ प्रवासी व १२ हवाई कर्मचारी होते. विमानात मुख्यतः इज्राईल, फ्रांस, ग्रीक, अमेरीका, इंग्लंड तसेच इतर देशातील नागरीक प्रवास करीत होते. विमान अवकाशात झेपावताच अवघ्या काही वेळातच विमानाला २ पॅलेस्तीनी आणि २ जर्मन अतिरेक्यांनी अपह्रुत केले. पैकी २ अतिरेकी 'Popular Front for the Liberation of Palestine – External Operations' आणि उर्वरीत २ 'German Revolutionary Cells' या संघटनांशी संबंधीत होते.

फायली : एक दाबणे !

लेखक यकु यांनी मंगळवार, 03/04/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक: मानस चक्रवर्ती, 'लूज कॅनन' या स्तंभातून हिंदुस्तान टाइम्स, दि. 01.03.2012 http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx भारतात पुकारलेल्या आणीबाणीचे रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयातून गायब झाले आहे - भारत सरकार. -------------------------------------- जुन्या सरकारी कागदपत्रांचे रक्षण करणार्‍या सरकारी अधिकार्‍याची मी घेतलेली ही मुलाखत. याचे कार्यालयीन पद Librarian and Information Archives Registrar (LIAR) आहे. मी: ही एवढी महत्त्वाची कागदपत्रे अशी कशी सहज गायब होऊ शकतात?

द अंडरटेकर!

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी सोमवार, 26/03/2012 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला! मार्क विल्यम कॉलॉवे.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

निद्रेचा तुरुंग

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/02/2012 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९६६, १९६७ अणि १९६८ साली पावलो कोएल्होला मानसिक रुग्ण ठरवून समाजाला घातक ठरण्याची शक्यता आहे असे सांगून द्वाखान्यात भरती करण्यात आले. त्यावेळी त्याने लिहीलेली ही काही पाने.......... ही पाने ब्राझीलच्या सिनेटमधे वाचून दाखवण्यात आली आणि या संदर्भातील बरेच कायदे बदलण्यात आले व अशा रुग्णांकडे माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची पद्धत रूढ झाली. निद्रेचा तुरूंग. – स्वैर भाषांतर. २० जुलै, बुधवार. ८.०० रक्तदाब घेण्यासाठी मला त्यांनी उठवले तेव्हा मला कळाले की मी स्वप्नात नव्हतो. हळुहळू माझ्या डोक्यात वास्तव शिरायला लागले. त्यांनी मला लगेच कपडे करायला सांगितले.

असा अविचार करू नको

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 08/02/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक] निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू डाव नव्याने मांड आता, उगाच ते