Skip to main content

लेख

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर यांनी मंगळवार, 07/05/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 06/05/2013 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १ युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire

टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-३

नागुमोच्या इच्छेविरुद्ध जपानची युद्धाकडे वाटचाल चालूच होती.

पानिपतची पहिली लढाई

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 05/05/2013 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाबराचा बाप उमर शेख मिर्झा याला परंपरागत पद्धतीने काबुल चे राज्य मिळाले होते. काही कारणाने ते त्याच्याकडून जाऊन त्याला फरहाना (सध्याचे उझबेकिस्तान) (सिर्दार्या नदीच्या उगमाजवळचा प्रांत-राजधानी आदिजान) प्रांत मिळाला.बाबराला बापाकडून हे राज्य मिळाले. हा संपूर्ण प्रदेश डोंगराळ आहे.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २

लेखक किलमाऊस्की यांनी शुक्रवार, 03/05/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १ रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती.

मेरा कुछ सामान …

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 02/05/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्पना : इज्ज़ाज़त सिनेमा मधील " मेरा कुछ सामान " या गीतावरून आली आहे. आज राज घरी एकटाच होता. रजनीशी फारकत घेऊन चार दिवसच झाले होते. आयशा हि सध्या त्याच्याच घरी राहण्यास आली होती. आयशा सह कर्मचारी राजची. पण काही दिवसातच दोघाचे सुत जमले आणि तेरा वर्षाचा राज आणि रजनीचा संसार पत्या सारखा विखुरला. आयशाने घरी येताच रजनीचे जे काही सामान होते ते तिच्या घरी पाठवायला सांगितले राजला. वरतून अशी ताकीद हि कि जेव्हा मी ४ दिवसात पुण्यावरून परत येईन तेव्हा रजनीचा साधा रुमाल हि मला घरात नको आहे. झाले हि तसेच. आयशा ने जसे सांगितले तसे राज ने रजनीचे सर्व सामान पाठवून दिले. आज तो घरी एकटाच होता.

आज हुतात्मा प्रफुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 02/05/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २ मे, आज हुतात्मा प्रफ़ुल्लचंद्र चाकीचा १०५ वा हौतात्म्यदिन. प्रफुल्ल चाकीचा जन्म पूर्व बंगालच्या बगुडा जिल्ह्यातील रंगपूर गावचा. पितृछत्र बालपणीच हरवलेला प्रफ़ुल्लचंद्र शालेय जीवनात देशकार्याकडे आकर्षित झाला आणि त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. पुढे क्रांतिकारकांशी ओळख हो‌ऊन प्रफुल्ल बरिंद्रनाथ व अरविंद घोष यांच्या ’युगांतर’ मध्ये सामील झाला. आपले आयुष्य त्याने देशाला वाहायचे ठरविले होते. युगांतर मध्ये त्याने भाग घेतलेली पहिली मोठी कामगिरी म्हणजे बॅम्फिल्ड फुलर या जुलुमी अधिकाऱ्याच्या वधाचा कट.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 01/05/2013 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 01/05/2013 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १ Simple, Free Image and File Hosting at MediaFire

टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-२

पर्ल हार्बरवर हल्ला चढवायची मूळ कल्पना जपानच्या विमानदल व नौदलाच्या एकत्रीत दलाचा कमांडर-इन-चीफ ॲडमिरल इसोरोकू यामामोटो याची.