Skip to main content

लेख

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

आईपणाचा उदोउदो

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 06/05/2010 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
मे मासाचा दुसरा रविवार आला की आम्हां लेकरांच्या पोटात मायेचा गोळा उठून आम्ही आई आई करीत टाहो फोडतो. जगभर मदर्स डे साजरा होत असतो अन् आम्ही भारतीय कार्टे आईचा उदो उदो करून घेतो... मातेविना सृष्टी नाही, ममतेबिगर दृष्टी नाही हे खरे असले तरी अपत्यप्रेमाची वृष्टी कशी करायची तिचे तीच जाणे. आमच्या बापाला ते जमलं तर नाहीच, आम्ही बाप झाल्यावर आम्हालाही जमत नाही. रडणारं पोट्टं आम्ही डोईवर घेऊन गावभर फिरवलं तरी शांत होत नाही. परंतु 'ओ रे बाळा' अशी मंजुळ वात्सल्यमयी मातृसाद कानी पडली की बाळोबा तिच्याकडे झेप घेऊन खिदळणार हे जन्मापासून ठरलेले.

हबल- २० वर्षांची यशोगाथा!

लेखक Nile यांनी मंगळवार, 04/05/2010 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर चारशे वर्षांपुर्वी, म्हणजे १६१० मध्ये 'गॅलीलीओ गॅलीलीने' प्रथम त्या निळ्या आकाशात काय आहे हे बघण्याकरता दुर्बिण आकाशाकडे रोखली. तेव्हा आकाश म्हणजे स्वर्ग अशी मानवाची कल्पना होती. इंग्रजीतील 'हेवन' हा शब्दाचा उगम,अर्थच आकाशाशी(sky) संबंधीत आहे. कदाचित या 'स्वर्गाच्या ओढीनेच' मानवाला आकाशात डोकावायची इच्छा झाली असेल का? काही का असेना, या 'दुर्बिण परंपरेमुळे' जितके अवकाश मानवाला आजवर दिसले आहे त्यावरुन अवकाशाला 'स्वर्गीय' हे विषेशण मात्र अगदी चपखल बसावे!

दंतविहीनांचे दाताळ अनुभव

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 01/05/2010 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
(खालील लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आज मिपाकरांसाठी इथे देत आहे. प्रस्तुत लेखात कोणाची खिल्ली, थट्टा उडवण्याचा मानस नसून आयुष्यातील एका अटळ सत्याकडे विनोदी चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न केला आहे! :D ) आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे?

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 01/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे. आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे. पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता.

तू माने या ना माने दिलदारा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 27/04/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा! ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत. सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने कृतकृत्य करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत.... ...

अक्षम्य

लेखक झुम्बर यांनी सोमवार, 26/04/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्रेयस ने आत्महत्या केली .... आमच्याच ऑफिसच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून ... क्षणभर काय होतंय काय झालाय याच भानच मला उरल नाही .... रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याचे निष्प्राण कलेवर पाहून मी गलबलून गेले. श्रेयस कॉलेज मध्ये मला दोन वर्ष सिनिअर कॉलेज मध्ये पाऊल टाकल आणि नोटस वगैरे मिळवण्याची गडबड सुरु झाली. तेव्हा आमच्या ह्या सिनिअर नी परीक्षेसाठी आमच प्रबोधन केल होत...वाट्टेल ती मदत करेन असा सांगितलं होत आणि शब्द पाळलाही होता. प्रचंड उत्साह, सकारात्मकता अशी नुसती ओसंडून जायची त्याच्या एक एक शब्दातून.