Skip to main content

लेख

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 05/10/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला." मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे. तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.

माहितीचा अधिकार चार वर्षे वयाचा होतोय

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 04/10/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १२ ऑक्टोबरला माहितीच्या अधिकाराबाबतच्या कायद्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. भारतातील जनसामान्यांना हवी असलेली आवश्यक ती माहीती सहजपणे मिळण्याच्या अधिकार असावा व त्यायोगे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी अण्णा हजारे व अन्य काही समाजसेवक, नेते, विचारवंत, पत्रकार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून हा क्रांतिकारक कायदा २००५ साली अस्तित्वात आला.

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 03/10/2009 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली. मी वैद्यांना म्हणालो, "प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं स्वतःला खास समजतात.ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?" माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले, "कोणी काही खास नसतो.उदाहरण म्हणून, रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.एखादा स्वतःला अगदी आदर्श समजणारा सुद्धा काही खास नसतो.पण कृपाकरून माझ्या

उत्तेजनार्थ!..

लेखक नीधप यांनी रविवार, 27/09/2009 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं. मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं. दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी.

'नोकरशाई' च्या निमित्ताने

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 26/09/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन. ''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा!

अमेरिकन काटकसरी झाला.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/09/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचं घर हवंच.मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं. कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरून घरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी "अर्न ऍन्ड स्पेन्ड" वर चालते.क्रेडीट कार्डावर दहा दहा हजार, डॉलर्स कर्ज काढा.