Skip to main content

माध्यमवेध

काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 21/05/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा 'देवदास' आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती. 'पण मला तर आवडला बुवा' एक कन्या म्हणाली. 'काय आवडले तुला?' असा प्रश्न विचारताच 'कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.' कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही मिनिटे भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

नारायण सान्याल आणि काही प्रश्न...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 08/05/2012 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-grants-bail-to-N… बातमी नीट वाचली. मात्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले.

जन्नत २

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 07/05/2012 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे. नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा.

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी गुरुवार, 03/05/2012 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू! आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना?

मरण, मृत्यू वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी बुधवार, 02/05/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
युजींसंदर्भात मित्रांशी होणार्‍या बोलण्‍यात नेहमी हा मुद्दा येतो की युजींमध्‍ये युनिक असं काय ? मला जे त्यांच्यातलं युनिक जाणवतं ते म्हणजे किंचीतही गूढ अर्थ मागे न ठेवता सोप्या शब्दांच्या मदतीने प्रश्नाला भिडणे. खूप सुरुवातीच्या काळात युजींचा पवित्रा संवाद सुलभ होता, त्या वेळचा हा संवाद.

तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 30/04/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी 'एका तिकिटात दोन बालनाट्ये आणि आइसक्रीम मोफत' अशा जाहिराती आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत.