सारं लुगड्यात गमावलं...!
सारं लुगड्यात गमावलं...
हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.
मिसळपाव
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.