मुक्तविहारींची भाषणभरारी
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते.
डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.
मिसळपाव