Skip to main content

प्रकटन

(बापाचे) मुलास पत्र.

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 19/05/2011 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाळ्या, "बघता बघता तू किती मोठा झालास. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं आज नोकरीनिमित्ताने दुसरीकडे भुर्र उडून गेलं आहे.", असं बोलत डोळे टिपून तुझी आई मला बोर करत असते. पण होईल नीट हळूहळू. तुझा प्रवास चांगला झाला असेलच. जायच्या आधी तुझ्या आईच्या बडबडीमुळे काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या लिहितोय. मानापमान - नोकरीत बॉसच्या मानापमानाच्या भावना फार तीव्र असतात, पण बॉसने दिलेल्या शिव्यांनी आपला अपमान होत नसतो हे लक्षात ठेव.

आईस पत्र

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 19/05/2011 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
शुचिचे मुलीस पत्र पाहून मलाही पत्रलेखनाची सुरसुरी आली. पंतप्रधान आणि/किंवा जगप्रमुख (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना पत्र लिहीण्याएवढा मला वेळ नाही. मग ("माझ्या" काल्पनिक) आईलाच पत्र लिहून टाकलं. हाय आई, आता मोठी समजशील, नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्‍या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस. अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं.

गजर (Journey of the soul)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 18/05/2011 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
गजर (Journey of the soul) लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट --- १८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्‍या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात .. त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या..

एडसचा जीवघेणा पाश

लेखक पिंगू यांनी मंगळवार, 17/05/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक सत्य घटना आहे. मी स्वत: अनुभवलेली. ही कथा आहे दहा वर्षापूर्वीची. जेव्हा मला मूळव्याधीच्या उपचारासाठी एका इस्पितळात भरती करण्यात आले होते. त्या इस्पितळात एक मोठे दालन होते जिथे बहुतेक सर्व रुग्ण दाखल केले जात आणि मी पण तिथेच होतो. मी तिथे डेरेदाखल झाल्यानंतर रोज एक वेगळा रुग्ण म्हणून मला जी वागणूक मिळाली ती खूपच चांगली होती. कारण काय तर मी एक वेगळा रुग्ण आणि विद्यार्थ्यासाठी एक अभ्यासाचा भाग होतो.

मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 16/05/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १ http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २ ************************************************************** काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली.

सुरवंट

लेखक गौत्या यांनी सोमवार, 16/05/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
९.४६. अंधेरी स्टेशन. लोकलला फारशी गर्दी नव्हती. निदान माझ्यासाठी तरी. मी मोठ्या चपळाईने वाऱ्याची खिडकी पकडली होती. गाडी भरत होती. अनेक माणसे आपला अजून एक दिवस ढकलायला चालली होती. या दरम्यान असाच कोणीतरी एक तो माझ्या शेजारी बसला. मला काय करायचं? कोणी का असेना? मी आणखी सरकणार नाही हे त्याला जाणवावं म्हणून मी किंचित पसरुन बसलो. २-३ बूट पोलीशवाले, १ भिकारी, मोबाइल मोठ्याने बोलणारे महाभाग असे नमुने येत जात होतेच. माझ्या समोरच्या सीटवर एक मराठी बाणा बसला होता. “मोडेन पण अजिबात सरकणार नाही”. लायकी फर्स्ट क्लास ची असूनही परोपाकाराखातर सेकंड क्लास मध्ये आलेल्या लोकांचा मला खूप राग येतो. असो.

'अविस्मरणीय' उटी कोडाई

लेखक स्मिता. यांनी रविवार, 15/05/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना: या लेखातले सर्व अनुभव १००% सत्य घटना असून त्यात काल्पनिक असे काहीही नाही. त्यात काही काल्पनिक वाटल्यास ते आमचे दुर्दैव समजावे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ कधी कधी असे अनुभव येतात की वाटते एखाद्या गोष्टीचा विचार करताना जर ती अयोग्य, चुकीची किंवा करू नये अशी वाटत असल्यास ती न केलेलीच उत्तम! तसा माझा शकुन-अपशकुन, दैवी संकेत, इ. गोष्टींवर विश्वास नाही पण जिथे आपलं मनच नाही म्हणतं तिथे उगाच शहाणपणा करूच नये.

कॉशसली ऑप्टीमिस्टीक

लेखक रामदास यांनी गुरुवार, 12/05/2011 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
डांबीसानी रसाची वाटी जरा निरीच्छेनीच बाजूला ठेवली. मास्तराकडे बघत एकदा च्यक असा आवाज काढला. आंबेवाले विजूभाऊ गॉड हसत म्हणाले "कसे होते आंबे.." मास्तरानी एक विचीत्र आवाज काढत विजूभाऊंचं संभाषण मूळातच बंद करून टाकलं. मुक्तसुनीत पेंगत होता. श्रावण मोडकांनी त्याच्या हातातली जाडजूड कादंबरी हळूच काढून घेतली आणि त्याच्या डोक्याखाली ठेवली. चतुरंग पाचव्यांदा ए-२ *सी-५ असं म्हणत जागा बदलत राहीला. बिपीन होमसिक झाल्यासारखा खिडकीजवळ उभा राहून एखादा उंट दिसतो का ते बघत बसला होता.