II श्रीराम समर्थ II
श्रीमद दासबोध अभ्यासक्रम
आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही.
अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे.
दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात.