Skip to main content

प्रकटन

बीटी पोर!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 07/03/2010 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय. आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले. त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद! "तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? " "का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!" "अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?" "म्हणजे? मी नाही समजलो... " "अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय...

कोलाज

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/03/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला? चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली. "मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं.

नंदाच्याई

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 06/03/2010 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नंदाच्याई... आम्ही लहानपणापासून त्यांना "नंदाच्याई'च म्हणत आलो. त्यांच्या मुलीचं नाव "नंदा', म्हणून त्यांना "नंदाच्या आई' असं नाव पडलं, हे आम्हाला खूप उशीरा कळलं. आमच्या शेजारीच राहायच्या त्या. अगदी घरासमोरच. आमच्या आवाराच्या मालकांनी दोन खोल्यांची जागा या आखाडे कुटुंबाला राहायला दिली होती. नंदाचे बाबा- म्हणजे नंदाच्याईंचे पती- हमाली करायचे. त्यांची स्वतःची हातगाडी होती. (हातगाडी म्हणजे दोन चाकांची, एका बाजूने ओढायची लांबलचक लाकडी गाडी. त्यावर माल ठेवून ओढून नेतात.

मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो................एवढंच

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 06/03/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या , माझा लेख वैयक्तिक टीका करत असेल तर कृपया फक्त त्यांचे नाव काढून टाकले असते तर बरे झाले असते, मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो. कधी कुणाचे अंधानुकरण करत नाही माझ्या लेखांवर माझे नाव घेऊन टीका करणार्यांवर तुम्ही काय कारवाई कराल ते मला जाणून घ्यायचे आहे असो मला माहित नव्हते कि मिपा वर नवीन व जुन्या खाते धारकांवर भेद-भाव केला जातो. आपले जाल म्हणून आपणास तटस्थ मानत आलो. घोर निराशा झाली या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी. मंगेश पावसकर

रेज

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 05/03/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
दर आठवड्याला दोन दा तज्ञांकडुन तपासणी. शाळेच्या जाहिरातीतील एक वाक्य. कुतुहल वाढले. बघुया काय प्रकार आहे ते. फोन लावला. समोर ज्या कुणी अधिकारी होत्या त्याना प्रश्न विचारला. "कसली तपासणी हो? ती सुद्धा आठ्वड्यातुन दोन दा" We talk to students to find out any presence of uncontrolled rage, dent in personality not noticed by parents. कुठल्या यत्तेतील? From first standard onwards, बाई म्हणाल्या. कसले प्रश्न? उदाहरण म्हणुन एखादा सांगा. Like Who is your favourite actor.? एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर? We conclude that the child is having tilt towards violence. कोण आहेत हो ट्रस्टीज.

ती....

लेखक हर्षद आनंदी यांनी शुक्रवार, 05/03/2010 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंताने दिली आहे ती माझ्यासाठी, माझी आहे ती.. नक्कीच तुमच्या कडेही असेलच ती.. प्रत्येकाकडे असतेच ती; तिचे अस्तित्व ती नसली तरी असते, सतत अवती भोवती जाणवत असते... मनाच्या गाभार्‍यात, खोल कुठेतरी काळजात ती आहे हा विश्वास असतो.. एक अनामिक ओढ असते! एक अनाकलनिय हुरहुर, एक न सांगता येणारी उर्मी.. भर उन्हात एक झुळुक गारव्याची ही म्हणजे जणु देव्हार्‍यातली समई, स्वतः जळुन प्रकाश वाटणारी, नमस्कार करणार्‍याला दिशा दाखवुन नामानिराळी राहणारी.. भक्ताची नाळ देवाशी जोडुन देणारी!! किती रुपे तिची, प्रत्येक रुपात नविन असते ती!

माझे संत्रापुराण

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 04/03/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते. काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते!

प्रथम तुला वंदितो

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 04/03/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. आम्हि अर्धवटराव. नावाप्रमाणेच आचार, विचार, उच्चार, आणि इतर बर्‍याच बाबतीत आम्हि अर्धा पेला भरलेला (कि रिकामा... काय ते असेल) आहोत. काहि बाबतीत मात्र आम्हि परिपूर्ण आहोत... पण त्यांचि आम्हाला अर्धवट माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा कि अश्या आमच्या सारख्या मडक्यांचि ठण्ठण् कोणिही ऐकुन घेत नाहि. अश्या उदास अवस्थेत व्रुथा भुमीवर भटकत असता आम्हाला या मिसळेच्या हाटेलाचा पत्ता सापडला. बरेच दिवस हाटेलाबाहेर उभं राहुन आम्हि आत यावं का हा विचार केला. इथे कसली तालेवार मंडळी आहेत. कोणि संगीत कोळुन प्यालय तर कोणि सहित्य. कोणाला राजकारण आवडतय तर कोणाला समाजकारण.