Skip to main content

प्रकटन

वस्तरा टी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 16/09/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, नविन गाडी आली आहे बाजारात. लय भारी आहे. घेउ का" नउ महिने झाले आधीचा रणगाडा घेउन. आता परत. " ती छोटु ला देउ. आमचे अंडरस्टँडींग आहे. मी वापरायची नंतर त्याला द्यायची" काय सांगतोस? तो पण तुझ्या लायनीला आला का? हे केंव्हापासुन? "तुम्ही 'शोषीत महिला उद्धार 'संघाचे अध्यक्ष झालात तेंव्हापासुन" अरे पण आता वस्तरा टी मोहीम सुरु आहे ना? " अहो बाबा, वस्तरा टी नाही ऑस्टॅरीटी मोहीम. तुमची सदावर्ते बाईंची शिकवणी फुकटच गेली. इंग्लिश चे वांदे तसेच आहेत". हो रे बाबा. काल मिटींग मधे साहेब इंग्लिश मधेच बोलला. त्यामुळे सगळे डोक्यावरुन गेले.

बतावणी!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 11/09/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थ्ळ - वैकुंठ शीन - हातात 'मादक आणी जहाल'चा मग सहजच घेऊन महालात श्री विष्णू पहुडले आहेत ६० इंची एल्सीडीवर प्रोग्रॅम सुरु आहे जोरजोरात हसण्याचे आवाज येताहेत! (महालात प्रवेश करत) नारद : "नारायण, नारायण!" विष्णूंचं लक्ष नाही असं पाहून पुन्हा एकदा मोठ्याने "नाऽऽरायण! नाऽऽरायण!!" टीवीवरची नजर ढळू न देता विष्णू एका हातानेच थांबायची खूण करतात! एवढ्यात कार्यक्रमाचे प्रायोजक 'मिपाकर स्वयंभोचक संघाची' अ‍ॅड सुरु होते आणी विष्णू टीवी म्यूट करतात. "हा हा हा! मेलो मेलो!! कॉकटेल उडाली ..ठ्यॉ!! बसा बसा मुनिवर!!" "काय हे देवा?

"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 08/09/2009 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
भंगारातून चांगल्या प्रतीचे पोलाद बनविण्याची सर्वसाधारण पद्धत या पद्धतीत खालील टप्पे येतात: भंगार भरणे, भंगार वितळवणे, पोलादाचे शुद्धीकरण व ओतकाम. त्यानंतर रोलिंग. भंगार भरणे: पहा आकृती १ व २Fig 1: Filling the charging bubkets आकृती १: भंगार एक तर "ग्रॅब बकेट"च्या सहाय्याने भरले जाते किंवा दीड ते दोन मीटर व्यासाच्या मोठ्या लोहचुंबकाद्वारे भरले जाते.

म्हाळसाक्का.. ३

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 08/09/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का १ म्हाळसाक्का २ तो ही चालू लागला. कुठेतरी या म्हातारीबद्दल माया वाटू लागली होती. "काम मिळाले की या म्हातारीला भेटायला यायचं पुन्हा" असा निश्चय त्याने केला.. पण इतक्यात.. काम??? दामू कडं... !! काय सांगायचं ??म्हातारीनं पाठवलं म्हणून?? कोण म्हातारी?? कुठली?? नाव काय?? दामूला कुठल्या म्हातारीनं पाठवलं म्हणून सांगायचं?? त्याला काहीच सुधरेना.. हिचं नाव आपण परत विचारलंच नाही. काय करायचं?? बघू!! काहीतरी करूच.. दामूने नाही दिलं काम तर दुसरीकडे कुठेतरी करू..

गोष्टी योगायोगाच्या

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/09/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरीच्या दौऱ्याविषयी गेल्या वेळी लिहिलं होतं. याच प्रवासात आणखी एक गंमत घडली. "मोकळे' होण्यासाठी आम्ही मलकापूरच्या पुढे एका ठिकाणी सहज थांबलो. शेजारीच एक छोटा ओहोळ आणि त्यावर पूल होता. पलीकडे एक छोटीशी टपरी होती. अचानक हर्षदाला आठवलं, "अरे, रत्नागिरीच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी आपली एसटी इथेच बंद पडली होती!' मीदेखील आसपास पाहिलं आणि ओळखीच्या खुणा पटल्या. तीच छोटी टपरी, तोच सुनसान रस्ता आणि तेच वळण. लग्नानंतर पहिल्यांदा रत्नागिरीला गेलो, तेव्हाच्या प्रवासात आमची रात्रराणी बंद पडली होती तिथे. पहाटे चारचा सुमार असेल. अंधुकसं फटफटलं होतं. गाडी काही लवकर दुरुस्त होणार नव्हती.

हम जब होंगे.....

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 07/09/2009 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांनी रिकामा वेळ मिळाला. ९.३० वाजेपर्यंत झोप काढली. दादरला जायचे होते. पण ते दुपारी ३ नंतर. त्यामुळे आता करायचे काय हा प्रश्न उभा राहीला. 'सर्वसाधारण गृहस्थ 'ही भुमिका निभावुया आज असे वाटले. हातात झाडु घेतला. घरातली जळमटे कढली. जास्त नव्हती. लगेच आटोपले. संडास बाथरुम पावडर टाकली. रद्दी विकुन आलो. ट्युबलाईट बदली केली. ब्रशने संडास बाथरुम साफ केले. जवळ जवळ १० वर्षाने 'नॉर्मल हजबंड' ची कामे करताना बघुन सौ.

म्हाळसाक्का..२

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 04/09/2009 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का.. भाग १ "मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले.. "मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली. तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं. *********** तो तिच्याकडं बघतच राहिला. म्हाळसाक्कानं त्याच्या पुढतला वाडगा उचलला आणि मागे निंबोर्‍या जवळ असलेल्या मोरीपाशी नेऊन धुऊन आणला आणि पुन्हा कोंडाळात ठेऊन दिला. तो तिच्या भराभर होणार्‍या हलचालींकडे बघतच राहिला.

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.