प्रतिभा
सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती
तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती
सुखाची काळजी काही करावी लागली नाही
मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती
भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू?
तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती
सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?
सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की
बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती
खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला
कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
Taxonomy upgrade extras
एक भावगीत
एक प्रेमगीत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
मला सोसेना उबारा ...मला सोसेना हिवाळा
मी होऊन खारोटी
तुझ्या ओंजळीत
घेईन विसावा.
* * * *
मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा
मी होऊन चांदणे
तुझ्या अंगणात
मागेन जोगवा.
* * * *
माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ
मी रंगून विड्यात
तुझ्या ओठावर
सांगेन ओळख.
* * * *
Taxonomy upgrade extras
कुणाच्या ह्या वेणा
माझ्या एका जुन्या चारोळीला घेऊन मीटरमधे कविता लिहायचा प्रयत्न. पहिले कडवे ही जुनी चारोळी.
कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी
झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रूततोय आरपार
कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला
-नी
Taxonomy upgrade extras
-गणेश स्तवन-
गणेश -स्तवन
गणेश माझा आहे सुन्दर
कटी तयाच्या शुभ्र पीतांबर
प्रभा तयाची दशदिशांवरी
नभी उगवला वाटे दिनकर !
कटी मेखला नागांची ही
डोक्यावर्ती जुडी दुर्वांची
आहे गणेश मोहक माझा
हाती मोदक त्याच्या शंभर!
दुखे हरतो भक्ताची हा
आहे गणेश माझा सुखकर
पुजिती त्याला देवही सगळे
आणी मराठी हा जनसागर !
-अनिरुद्ध-
Taxonomy upgrade extras
ठेवणीतले आवाज ..
नमस्कार मंडळी,
आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही.
कशी येशील कोंदणी??...(व्हॅलेंटाईन डे स्पेशल)
मिपाकरांना व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देणारी प्राजूची 'कधी येशील कोंदणी??...' ही कविता वाचल्यावर आमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले नसते तरच नवल.
कशी येशील कोंदणी??...
तुझा चालणारा ढीग, जणू काजळाचा मेघ
मुळी सोसावेना वेग, पडे जमिनीला भेग
धनुष्य का भिवईचे, कोरूनसे काढलेले
डोळे तांबारले कसे, म्हशीसम रोखलेले
रंग त्यांचा भला बुरा, तिरळा का असे जरा?
पापण्यांचा गं पिसारा, रंगवुनी मस्कारा
कुंतल ते चार काळे, का सोडशी मोकळे?
लाव मेंदी ग तू खुळे, आरशाशी घुटमळे
मोठी तुझी गं जिवणी, नको रंगवूस राणी
बोलतेस जीवघेणी, भीतीने मी पाणी पाणी
तुझे हासणे ते 'मंद',
(गंधांच्या उलाढाली)
प्रेरणा भूषण कटककर ह्यांची गजल 'गंधांच्या उलाढाली'
जरा 'टाकून' बसलो तर बला कळवायला आली
तिच्या पक्षातल्या आंबूस गंधांच्या उलाढाली!
तिला जे पाहिजे नेले विदेशी ते तिने सारे
मला बसवून 'देशीशी' तिला साली मजा आली!
इथे येतात ते करण्यास गझला आणि कविताही
चला मारून फाट्यावर निघावे खालच्याखाली!
मिळावे रातच्याला हरितकी अन ऊन पाणीही
तसा मी उगवता वदतो, चला झाली, चला झाली!
गमन करण्या निघालो मी, हिच्यापाशी कसा आलो?
बरे नाही मिळाले पद्य की मी वाकडा चाली!
पुरेसे मोडके केव्हाच झाले गीत हे बाळा
करावी वाटता, गझलेस 'रंग्या' मोडता घाली!
चतुरंग
मिसळपाव