Skip to main content

प्रतिभा

मी,मी,मी,म्या,म्याउ!!!

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 26/07/2012 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी माऊ. मी फार फार हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे मी प्रचंड लाडावून ठेवलेली आहे. कुणी म्हणून काय विचारता? मी स्वत: मी इतकी स्वयंपूर्ण आहे की माझे लाड मी स्वत:च करत राहते. सतत मी फक्त माझेच लाड करते आणि माझेच गुणगान गाते.आता ज्यांना मुळात गाणंच समजत नाही त्यांना माझे गाणं बेसूरच वाटतं. जाऊ दे. तसे माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी राहतात. पण माझी बातच काही वेगळी. मी काही कुठल्या इतर तुच्छ प्राण्यांकडे लक्ष देत नाही. मी आपली स्वत:च्याच आनंदात मग्न घुर्र घुर्र करत बसते. काही प्राण्यांना कळते काहींना नाही. त्यांना मी पुन्हा तीच घुर्र घुर्र ऐकवते. शेवटी त्यांना मी काय बोलतेय ते कळतेच.

गणपुले काकू

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 24/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.) काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं.

अनपेक्षीत

लेखक चाफा यांनी शनिवार, 21/07/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
तशी ती रात्र काही खास वगैरे नव्हतीच रामजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असलेल्या त्या इमारतीत तरी नक्कीच नाही. तेच रोजचेच थकलेले, कण्हणारे पेशंट, जनरल वॉर्डची जी दशा सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये दिसते तशीच. नेहमीच्या प्रघाताप्रमाणे निवासी डॉक्टर राणेंसोबत चार इंटर्न्स , शिकाऊ डॉक्टर्स आजच्या रात्री उपस्थित होते. काम तसं काहीही नव्हतंच, निवासी डॉक्टर राणे नुकतेच त्यांचा राउंड संपवून परत गेले होते.

व्हायरस हंटर

लेखक हारुन शेख यांनी शुक्रवार, 20/07/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला विषाणू संशोधनातला 'इंडियाना जोन्स' म्हणतात. टाईम मासिकाने २०११ साली जगातल्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये त्याची निवड केलेली आहे.'स्टॅनफर्ड विश्वविद्यापीठाचे' सन्माननीय प्राध्यापकपद तो भूषवतो. आणि जिथे आधुनिक युगातील प्रगतीचा आणि सुखसुविधांचा गंधही नाही अशा आफ्रिका आणि आशियाच्या घनदाट वर्षावनांमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत रक्ताचे नमुने गोळा करत फिरत असतो. तीन वेळा त्याला मलेरियाचा जीवघेणा संसर्ग झालेला आहे. तिसर्या वेळचा संसर्ग तर इतका भयानक होता कि साक्षात मृत्युच्या दारातून तो परत आलाय.

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 19/07/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.