Skip to main content

प्रतिभा

उस्ताद अमीरखाँसाहेब !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 01/01/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख माझ्या आजोबांना म्हणजे कै. केशव चिंतामण कुलकर्णी यांना अर्पण. यांनी मला शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली तो दिवस मला आजूनही आठवतो. सवाई गंधर्वला मी त्यांच्या मांडीवर मस्त झोपलो होतो. तेव्हा पं भिमसेन जोशी गात होते. पण मी त्या दिवशी बरेच ऐकले हेही तितकेच खरे. मी मला वाटते चवथीत असेन. माझे आजोबा स्वत: उत्तम पखवाज वाजवायचे. दुर्दैवाने मला न ऐकवताच ते गेले. उस्ताद अमीरखाँसाहेब ! १७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील.

चल चांदण्यात जाउ...

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 29/12/2010 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
चल चांदण्यात जाउ... अंगणातल्या गुलमोहराखाली आरामखुर्चीत बसून सतीश प्रवासाची आणखी काय काय तयारी राहीली ह्याचा विचार करीत होता. संध्याकाळची फ़िकट उन्हे अंगणात पसरलेल्या लाल पिवळ्या सड्यावर रेंगाळत होती. झाडावर असतांना दिमाखात डवरलेली ती चटपटीत शाल आता तुसे तुसे होऊन जमिनीवर विखुरली आहे असे वाटत होते. उद्या सकाळी बाई कचरा झाडून बाहेर फ़ेकून देईल. “चहा थंड झालाय समोर. कुठल्या तंद्रीत आहेस?” सुमतीची हाक सतीशच्या कानाच्या बाजुने भिंत ओलांडून शेजारच्या रमाबाईंकडे पोहचली. “ह्यांचे बरे आहे. दोन्ही मुलांची लग्ने हो़उन आपापल्या गावी सेटल झालीत. ह्यांना इथे काही व्याप ना ताप.

(पृथ्वी समर्थ आणि पक्षनिष्ठा)

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 21/12/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्याच एका प्रसंगी दिल्लीच्या परिसरात काही नेते म्याडमदर्शनाच्या इच्छेने यत्न करत होते. युवराजांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे सहाय्य मागितले. युवराजांनी त्यांना निष्ठा दृढ करा असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर म्याडम आदिमायेच्या रूपात स्वीय सचिव, आपल्या खास मर्जीतली चौकडी, ट्रकभरून फायलींचा गठ्ठा, हातात बंद लिफाफा आणि एक स्वीस देशीची वर्गणी पुस्तिका अशा लवाजम्यासह तिथे दाखल झाल्या. त्या वेळी बरोबरच्या सचिवाला "वेळ निभवावी" असे म्हणून सिलेक्शन करायला सांगितले. सचिवाने एक टेबलखुर्ची मांडून त्यावर एक मेणबत्ती लावली व एकेक फाईल काढून वाचू लागला.