Skip to main content

समीक्षा

पीपली लाइव

लेखक प्रमोद्_पुणे यांनी रविवार, 15/08/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्‍या एका गरीब शेतकर्‍याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट.

First Things First

लेखक पारुबाई यांनी रविवार, 08/08/2010 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच जण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये वेळेचे नियोजन (Time Management) करत असतो. त्या विषयावरची वेगवेगळी पुस्तके वाचत असतो, टिप्स मिळवत असतो. अश्याच एका प्रयत्नामध्ये काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक उल्लेखनीय पुस्तक आले.ते पुस्तक आहे Stephen Covey चे First Things First. तुम्ही वाचले आहे का हे पुस्तक ?

पुस्तक परिक्षण: "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" आणि त्या पुस्तकाच्या पुढच्या मालिका..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 04/08/2010 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी" चे मराठी भाषांतर विकत घेतले आणि आताच वाचून संपवले. (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली) हे एक अप्रतिम पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा. दक्षिण अमेरिकेतील "शर्मा लिडरशीप इंटरनॅशनल " चे चालक, मालक, संस्थापक. त्यांची व्याख्याने जगभर होतात-व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे धडे याबद्दल. आणखी माहिती रॉबिनशर्मा डॉट कॉम वर वर मिळेलच. या लेखाचा मूळ उद्देश्य म्हणजे या पुस्तकाबद्दल मला आलेले अनुभव- बाजारात व्यक्तीमत्त्व विकास आणि लिडरशीपचे बद्दलचे तसे अनेक पुस्तके येतच असतात.

माझे सदस्यत्व .................

लेखक मृण्मयी दीक्षित यांनी रविवार, 01/08/2010 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ..... मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद......... माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........ आपली नम्र मृण्मयी दीक्षित

प्रेरणादायी २० गोष्टी

लेखक मोहन यांनी शनिवार, 31/07/2010 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज तर नक्कीच विमान चुकणार असा विचार करत कसाबसा अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचलो तर विमान दोन तास ऊशीराने असल्याचे फळकावर झळकत होते. हुश्श करुन चेक इन सोपस्कार आटोपले आणि वेळ घालवायला म्ह्णून पुस्तकाच्या दुकाना कडे वळलो. मुखपॄष्ठावर उलटी अक्षरे बघून कुतूहलाने साहाजिकच पुस्तक उचलले. Connect the Dots - रश्मी बंसलचे. त्यांच्या Stay Hungry Stay Foolish बद्दल कुठेतरी ऐकले होते. लेटेस्ट २०१० चे प्रकाशन व २०० रु किंमत पाहुन वेळ घालवायला बरे असेल म्हणून लगेच घेतले. "अचानक धनलाभ" माझ्या राशी भविष्यात होते की काय कोण जाणे.

ट्वायलाईट २ - 'न्यू मून'

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 25/06/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची ट्वायलाईटची ओळख आपण मागच्या भागात करुन घेतली. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ह्याच्या पुढच्या भागाची 'न्यू मून'ची. खरेतर पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख झाली असल्यास बर्‍याचदा दुसरा भाग थोडा संथ अथवा कंटाळवाणा वाटतो, पण 'न्यू मून' ह्याला निश्चीतच अपवाद ठरतो.

रावणाची सीता

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 20/06/2010 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते. तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही.