Skip to main content

समीक्षा

दुर्गा झाली गौरी!

लेखक विकास यांनी सोमवार, 15/09/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे. भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते.

'मुंबई मेरी जान' - चुकवू नये असा!!

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 12/09/2008 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला - 'डोंबिवली फास्ट'. चित्रपट फारच सुरेख जमलाय...मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही....फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही. सुचना/Disclaimer - Spoilers ahead!

माझी नवीन गुढ(भय्)कथा वाचुन अभिप्राय देणे

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 06/09/2008 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मी मिसळपावचा एक नवा सदस्य आहे...व्यवसायाने ज्योतिष मार्गदर्शक आणि गुढविद्या अशा क्षेत्रातील आहे ( म्हणजे पांढर्या कपड्यातील जरा बरा मांत्रिक म्हणलात तरी हरकत नाही) त्याचप्रमाणे एक हौशी गुढकथालेखकही आहे.

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 25/08/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.

वाचु आनंदे!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन, माझ्या सर्वात आवडिच्या छंदांपैकी एक. तसे म्हणाल तर ट्रेकिंग, पेन्सिल स्केचेस, लिखाण हे माझे सर्वात आवडते छंद आहेत, खालोखाल टपाल तिकीटे गोळा करणे, संगीत ऐकणे, फोटोग्राफि, नाणी-नोटा जमवणे हे आणि असे अनेक छंद मला आहेत. एकेका छंदा बाबत थोडं थोडं लिहिन म्हणतोय. तर वाचन माझा आवडता छंद! किती वाचले या पेक्षा काय वाचले हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं. मुळात आपल्याला वाचता येतं हि भावनाच किती छान आहे?? मराठी-हिंदि-इंग्रजी तर आहेच पण तोडकं-मोडंक गुजराती पण मला वाचता येतं. कदाचित तुम्हाला वाटेल, वाचता येतं! यात काय विशेष? तर मग जे निरक्षर आहेत त्यांचा विचार करा. आणि मग त्यांनी कधी पु.ल.

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 31/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.

माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 20/07/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी कलाकार : मुक्ता बर्वे गिरीश जोशी निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal